पुणे, 21 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता आणखी पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी आणि स्कूल बसचा भीषण अपघात झाला. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. शैलेश गजानन जगताप असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात घडली. दुचाकीस्वार तरुण रामकृष्ण चौकातून काटे पुरम चौकाकडे जात होता. यावेळी स्कूल बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या वरून आदळल्याने दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आला आणि हा भीषण अपघात झाला, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
स्कूल बसला ओव्हरटेक करणं जीवावर; पुणे अपघाताचा भयानक व्हिडीओ समोर#Pune #RoadAccident #SchoolBus #News18Lokmat pic.twitter.com/ejEGq1aPlM
— News18Lokmat (@News18lokmat) December 21, 2022
हेही वाचा - शिक्षक आहे की सैतान? 10 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत पहिल्या मजल्यावरुन फेकलं; आईसोबतही.. काजूकतली फुकट दिली नाही म्हणून गोळीबार - सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे मुख्य रस्त्यालगत फुलपरी स्वीट मॉल आहे. सोमवारी या दुकानात दोन तरुण आले त्यांनी एक किलो काजू कतली घेतली. मात्र दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या तरुणांनी त्या दुकानदारावर गावठी पिस्तूल रोखून गोळी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी बाहेर आली नाही. त्यानंतर त्या तरुणांनी पुन्हा पिस्तूल नीट तपासून गोळी झाडली. मात्र गोळी दुकानातच पडली. या सर्व गोंधळात त्या ठिकाणी गर्दी जमल्याचे पाहून आरोपींनी धूम ठोकली. घटनेनंतर दुकानदारांनी खेळण्यातील बंदूक समजून त्या घटनेकडे दुर्लक्ष केले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लागलीच आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाससह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त केले आहेत. भर रस्त्यालगत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.