जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / चिंचवड पोटनिवडणुकीत मोठं ट्विस्ट; आता ठाकरे गट नाराज, सचिन आहिरांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण!

चिंचवड पोटनिवडणुकीत मोठं ट्विस्ट; आता ठाकरे गट नाराज, सचिन आहिरांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण!

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आता ठाकरे गट नाराज झाल्याची माहिती समोर येत असून, सचिन आहिर यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे,  11 फेब्रुवारी : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून सध्या राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. राहुल कलाटे यांची बंडखोरी मोडून काढण्यात महाविकास आघाडीला अपयश आलं. या बंडखोरीचा मोठा फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो अशी चर्चा आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. संपर्कप्रमुख असूनही माझ्या पक्षाला एकही जागा लढवता आली नाही, म्हणून मी देखील नाराज असल्याचं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे. संचिन आहिर यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.   नेमकं काय म्हणाले सचिन आहिर?  सचिन आहिर यांनी पुण्यातल्या कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारावरून नाराजी व्यक्त केली आहे. मी संपर्कप्रमुख असून माझ्या पक्षाला एकही जागा लढवता आली नाही. म्हणून मी देखील नाराज आहे. जर भाजपच्या जागेवर आम्हाला उमेदवारी मिळणार नसेल तर मग आम्ही उमेदवारी कुठे मागायची? मी चेतन तुपे आणि सुनील शेळके यांना देखील हेच विचारलं. जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे उमेदवारी मिळेल ही आमची अपेक्षा आहे, असं  सचिन आहिर यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :  आता विरोधकांच्या हत्याच…; पत्रकार वारीशे प्रकरणात राऊतांचे फडणवीसांना खरमरीत पत्र, केली मोठी मागणी ’ उमेदवार निवडून आणण्यासाठी निर्धाराने प्रयत्न’   दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की? महाविकास आघाडी म्हणून भाजपला दूर ठेवण्याचा निर्णय झाला आहे. आम्हाला आणि आमच्या शिवसेना पक्षाला संपावण्याची भाषा ज्या भाजपने केली आहे. आमच्या पक्षात फूट पाडून चिन्ह गोठवण्याचा प्रकार करणाऱ्या पक्षाला हरवण्यासाठी दोन पावलं मागे घेण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करू असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात