जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आता विरोधकांच्या हत्याच...; पत्रकार वारीशे प्रकरणात राऊतांचे फडणवीसांना खरमरीत पत्र, केली मोठी मागणी

आता विरोधकांच्या हत्याच...; पत्रकार वारीशे प्रकरणात राऊतांचे फडणवीसांना खरमरीत पत्र, केली मोठी मागणी

संजय राऊत यांचे फडणवीसांना पत्र

संजय राऊत यांचे फडणवीसांना पत्र

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र राऊत यांनी पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर लिहिलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र राऊत यांनी पत्रकार वारीशे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर लिहिलं आहे. या पत्रामधून संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत- निर्भीड पत्रकार ज्या कोकणच्या भूमीत जन्मास आले, त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक असल्याचं या पत्रात संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं संजय राऊत यांनी? संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.’ ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत- निर्भीड पत्रकार ज्या कोकणच्या भूमीत जन्मास आले त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक आहे. याआधी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ‘ईडी’ ‘सीबीआय’ व पोलीस यंत्रणेचा वापर होत असे, पण आता विरोधकांच्या हत्याच होऊ लागल्या हे चिंताजनक आहे’.

जाहिरात

समांतर न्यायालयीन चौकशीची मागणी ‘कोकणात याआधी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर अशा राजकीय हत्या झाल्या व राजकीय दबावामुळे मूळ आरोपी मोकाट राहिले. त्याच खुनी मालिकेत शशिकांत वारीशे यांचे हौतात्म्य जोडले आहे. हे मी आपल्याकडे नमूद करू इच्छितो. वारीशे यांच्या हत्येचा निषेध मुंबई, दिल्लीसह जगभरातील पत्रकार संघटनांनी केला आहे. पण कोकणातील इतर खुनांप्रमाणे हे प्रकरण दडपले जाईल, अशी भीती असल्यानेच या खुनाची समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी तसेच शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांना किमान 50 लाखांचे अर्थसहाय्य करावे अशी विनंती मी करत आहे’, अशी मागणी संजय राऊत यांनी या पत्रातून केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात