पुणे, 08 फेब्रुवारी**:** हॉटेलमध्ये गेलो की आपण एखादी थाळी ऑर्डर करतो. नेहमीप्रमाणे पदार्थ मोजके पदार्थ सजवून ही थाळी तुमच्यासमोर आणली जाते. पण, पुण्यात एक भली मोठी थाळी तुमच्यासमोर येते. ती थाळी पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. सुरुवातीला ऑर्डर करतानाच तुम्हाला आर्श्चयाचा पहिला धक्का बसतो, कारण या थाळीचं नाव आहे, बाहुबली थाळी! आता या नावाप्रमाणेच ही थाळी ही पूर्णपणे अनोखी असणार यात काही शंका नाही. पुण्यातील ‘हाऊस ऑफ पराठा’मध्ये ही थाळी खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवत आहे. ऑर्डर करताना मेन्यूमध्ये बाहुबली थाळी हे नाव पाहिल्यावरच तुम्हाला ही थाळी काहीशी वेगळी असणार याचा अंदाज येतो. जेव्हा ही थाळी तुमच्यासमोर येते तेव्हा समजतं की, ही थाळी काहीशी नाही तर पूर्णपणे वेगळी आहे. या थाळीची अनेक वैशिष्ट्य आहेत. त्यापैकी एक म्हणजे, ही थाळी 7-8 माणसंही संपूर्ण संपवू शकत नाहीत, असं सांगितलं जातं. दुसरं म्हणजे, खवय्यांच्या चवीचा पूर्ण विचार करून या थाळीची निर्मिती केली आहे. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे, बाहुबली थाळीत नावाप्रमाणेच पदार्थांचा समावेश केला आहे. ‘देवसेना मिक्स पराठा’, ‘कटप्पा बिर्यानी’, ‘शिवगामी पंचपकवान’, ‘भल्लाल देव लस्सी आणि छास’ हे पदार्थ थाळीची चव वाढवत आहेत. तर, शाही पनीर, लच्छा पराठा, जीरा राईस, पापड हे देखील या थाळीच्या सैन्यात सामील आहेत. बाहुबली थाळी ही भारतामधील सर्वात मोठी थाळी असल्याचा दावाही केला जात आहे.
आप खाते-खाते थक जाएँगे पर ये थाली नहीं ख़त्म कर पाएँगे | ये है भारत की सबसे ज़ायक़ेदार और सबसे बड़ी थाली- बाहुबली थाली | #OMGIndia #OMGHindi pic.twitter.com/nnfBJeXj57
— HISTORY TV18 (@HISTORYTV18) February 7, 2020
(हेही वाचा : रुपया घसरल्यामुळे सोनं झालं महाग, वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव का? ) अशी आली बाहुबली थाळीची कल्पना ‘बाहुबली चित्रपट पाहिल्यावर तो मला प्रचंड आवडला. त्यानंतर मला कल्पना सुचली की, या चित्रपटातील पात्र आपण थाळीमध्ये आणली तर… त्यानुसार मग आम्ही या बाहुबली थाळी तयार केली’ अशी माहिती प्रशांत साळवी यांनी दिली. या कल्पनेनंतर थाळीमधील पदार्थांच्या निर्मितीपासून खवय्यांच्या टेबलपर्यंत पोहचवण्याचं काम कठीण होतं. या थाळीमधील पदार्थांचं कॉम्बिनेशन बनवण्यासाठी आमच्या टीमला 3 महिन्यांचा कालावधी लागल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा : Coronavirus वर इलाज शोधणाऱ्या टीमला पहिलं यश; भारतीय शास्त्रज्ञ करतोय नेतृत्व ) थाळीसाठी मोजावे लागणार… बाहुबली थाळीसाठी खवय्यांना 1 हजार 575 रुपये मोजावे लागतात.
(हेही वाचा : Team India विरुद्ध 6.8 फुटी गोलंदाज मैदानात, डेब्यू सामन्यासाठी ‘किवी’चा खेळाडू ) खवय्यांना बाहुबलीचं आव्हान ही संपूर्ण थाळी कोणी एकट्या माणसाने पूर्णपणे खाऊन संपवणे शक्य नसल्याचं प्रशांत साळवी सांगतात. कारण, थाळीमधील देवसेना पराठा हाच 22 इंचाचा आहे. 2 किलो पीठ आणि विविध भाज्यांपासून हा पराठा तयार करण्यात आला आहे. इतक्या साहित्यामध्ये तर आपल्या घरात 20 ते 25 पराठे तयार केले जातात. तर, ‘शिवगामी पंचपकवान’मध्ये सहा विविध भाज्यांचा समावेश आहे. मेथी मलाई मटार, छोले, मटार मसाला आदी भाज्या असतात. म्हणूनच, ही थाळी एकट्या खवय्याने खाऊन संपवण्याचं आव्हानच प्रशांत साळवी यांनी दिलं आहे. बाहुबली थाळीची चव चाखण्यासाठी तुम्ही नक्की पुण्यात या, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.