मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रुपया घसरल्यामुळे सोनं झालं महाग, वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव का?

रुपया घसरल्यामुळे सोनं झालं महाग, वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव का?

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण आल्यामुळे घरगुती बाजारात सोनं महाग झालंय. आठवड्याच्या कामाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे भाव वाढलेत.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण आल्यामुळे घरगुती बाजारात सोनं महाग झालंय. आठवड्याच्या कामाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे भाव वाढलेत.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण आल्यामुळे घरगुती बाजारात सोनं महाग झालंय. आठवड्याच्या कामाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे भाव वाढलेत.

  • Published by:  Arti Kulkarni

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण आल्यामुळे घरगुती बाजारात सोनं (Gold Prices Today Gold) महाग झालंय. आठवड्याच्या कामाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे भाव वाढले. सोन्याचे भाव 112 रुपये प्रतितोळा वाढले. त्याचवेळी चांदीच्या किंमतींमध्येही तेजी आलीय. एक किलो चांदीचे भाव 94 रुपयांनी वाढले.

सोन्याचे नवे दर

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत 41 हजार 249 रुपये प्रतितोळा झाले.आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 566 डॉलर प्रतिऔंस झाली. चांदीची किंमत 17.79 डॉलर प्रतिऔंस झाली.

चांदीची खरेदी महाग (Silver Price on 7th February 2020)

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. औद्योगिक मागणी वाढल्याने शुक्रवारी चांदीचे भाव 47 हजार 305 रुपये किलो झाले.

सोनं खरेदी करताना ही घ्या खबरदारी

1. तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायचं असेल सोन्याच्या दरांबद्दल जाणून घ्या. https://ibjarates.com/ या वेबसाइटवर जाऊन सोन्याच्या दरांबद्दल माहिती घ्या.

2. IBJA द्वारे ठरलेले दर देशात सर्वमान्य असतात. असं असलं तरी या रेट्समध्ये 3 टक्के GST नसतो.

3. असली सोनं 24 कॅरेटचं असतं पण त्याचे दागिने बनत नाहीत कारण ते मऊ असतं. दागिन्यांसाठी 22 कॅरट सोनं वापरलं जातं. यामध्ये 91. 66 टक्के सोनं असतं.

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या दिवसात ही चांगलीच सुवर्णसंधी आहे.

=======================================================================================

First published:

Tags: Gold, Money