जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Team India विरुद्ध 6.8 फुटी गोलंदाज मैदानात, डेब्यू सामन्यासाठी ‘किवी’चा खेळाडू सज्ज

Team India विरुद्ध 6.8 फुटी गोलंदाज मैदानात, डेब्यू सामन्यासाठी ‘किवी’चा खेळाडू सज्ज

Team India विरुद्ध 6.8 फुटी गोलंदाज मैदानात, डेब्यू सामन्यासाठी ‘किवी’चा खेळाडू सज्ज

6 फूट 8 इंच असलेला काईल जैमीसन भारताविरुद्ध वनडे आणि कसोटी सामने खेळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे पुढील सामन्यांसाठी टीम इंडियाने आणखी मेहनत घेतली आहे. दुसरीकडे न्यूझीलंड वनडे मालिका खिशात घालण्याच्या तयारीत आहे. यासाठी न्यूझीलंड पूर्ण तयारीत असल्याचं दिसत आहे. कारण, ऑकलँडच्या मैदानावर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज डेब्यू करणार आहे. 6 फूट 8 इंच असलेला काईल जेमीसन (Kyle jamieson)भारताविरुद्ध वनडे आणि कसोटी सामने खेळणार असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्या वनडेमध्ये जैमीसनला खेळवण्यात आलं नव्हतं. आता मात्र दुसऱ्या वनडेमध्ये त्याचा डेब्यू होणार आहे. ‘जेमीसन वेगवान गोलंदाज असून त्याच्याकडे चांगलं कौशल्य आहे. न्यूझीलंडच्या ‘ए’ संघामधून त्यांनी भारताच्या ‘ए’ संघासोबत सामने खेळले आहेत’ अशी माहिती न्यूझीलंडचे गोलंदाज प्रशिक्षक शेन जर्गेनसेन यांनी दिली. लेग स्पिनर ईश सोढीला टीमने न्यूझीलंड ‘ए’कडून खेळण्यास रिलीज केले आहे. याचाच अर्थ जैमीसन ईडन पार्कमध्ये डेब्यू करणार आहे. गेल्या महिन्यात जेमीसनने क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंड ‘ए’कडून इंडियाविरुद्ध तीन सामने खेळले होते. पहिला वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर मात केली होती. या सामन्यात रॉस टेलरने आपलं 21वं शतक साजरं केलं होतं. वनडे मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामनेही खेळले जाणार आहेत. अन्य बातम्या विवेकानंदांनी ईडन गार्डन्सवर घेतल्या होत्या 7 विकेट्स, इंग्रजांना चारली धूळ अशी पोहचली टीम इंडिया फायनलमध्ये, 150 सेकंदात पाहा युवा ब्रिगेडचा विजयी प्रवास! सचिनचा मोठा खुलासा! ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजात दिसते स्वत:ची छबी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात