मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Coronavirus वर इलाज शोधणाऱ्या टीमला पहिलं यश; भारतीय शास्त्रज्ञ करतोय नेतृत्व

Coronavirus वर इलाज शोधणाऱ्या टीमला पहिलं यश; भारतीय शास्त्रज्ञ करतोय नेतृत्व

कोरोना व्हायरस nCov विरोधातली लस निर्माण करण्यासाठी ऑस्ट्रेलियातल्या एका शास्त्रज्ञांच्या टीमला या प्रक्रियेतलं पहिलं यश मिळालं आहे. विशेष म्हणजे या टीमचं नेतृत्व एका भारतीय शास्त्रज्ञाकडे आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

सिडनी (ऑस्ट्रेलिया), 7 फेब्रुवारी : चीनमधून येऊन जगभर खळबळ माजवणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर इलाज शोधण्यासाठी प्रतिबंधक लस तयार करण्याचं काम वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये युद्धपातळीवर सुरू आहे. ऑस्ट्रेलियातल्या एका शास्त्रज्ञांच्या टीमला या प्रक्रियेतलं पहिलं यश मिळालं आहे. विशेष म्हणजे या टीमचं नेतृत्व एका भारतीय शास्त्रज्ञाकडे आहे. ऑस्ट्रेलियाच्या या शास्त्रज्ञांनी कोरोना (novel Coronavirus nCov) विषाणूची लॅबमध्ये निर्मिती केली आहे. रोगप्रतिबंधक लस तयार करण्याच्या दृष्टीने या विषाणूचा प्रीक्लिनिकल अभ्यास आवश्यक आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

कोरोना व्हायरसने आतापर्यंत 600 लोकांचा बळी घेतला आहे. हवेतून पसरणारा हा विषाणू असल्याने त्याचा संसर्ग वेगाने पसरतो आहे. ताप, सर्दी, अशी सामान्य लक्षणं असल्यानं या रोगाचं निदान व्हायला वेळ लागला. आता कोरोना व्हायरसची भीषणता हळूहळू जगासमोर येत आहे. चीनमध्ये यासंबंधी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. चीनबाहेरही अनेक देशांमधले शास्त्रज्ञ यासंबंधी काम करत आहेत. चीनबाहेरच्या प्रयोगशाळेत अशा प्रकारे पहिल्यांदाच या विषाणूची निर्मिती करण्यात आली. ऑस्ट्रेलियातल्या कॉमनवेल्थ सायंटिस्ट अँड इंड्स्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन Commonwealth Scientific and Industrial Research Organisation (CSIRO)या संस्थेतल्या शास्त्रज्ञांना हे पहिलं यश मिळालं आहे. प्रा. एस. एस. वासन यांच्या नेतृत्वाखाली हे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. वासन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं हे काम लसनिर्मितीच्या दृष्टीने पहिलं मोठं यश आहे. या विषाणूंची निर्मिती झाल्यानंतर त्यांचा अभ्यास शक्य आहे.

वाचा - कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात चार रुग्ण निरीक्षणाखाली, एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह

प्रा. वासन मुळचे भारतीय आहेत. त्यांनी BITS पिलानी आणि बेंगळुरूच्या IISC मधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर डॉक्टरेट करण्यासाठी ते ब्रिटनला गेले. तिथे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ट्रिनिटी कॉलेजमधून त्यांनी संशोधन केलं.

वासन यांनी डेंग्यू, झिका आणि चिकुनगुन्या या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचा अभ्यास केला आहे. आता nCov अर्थात कोरोना विषाणूचा ते अभ्यास करत आहेत.

अन्य बातम्या

Coronavirus : जगाला 'कोरोना'चा इशारा देणाऱ्या डॉक्टरचाच व्हायरसनं घेतला बळी

चीनी कंपनीचा डेटा लीक, कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत झाला 24 हजार लोकांचा मृत्यू

First published:

Tags: Coronavirus