मराठी बातम्या /बातम्या /पुणे /...तर चर्चा शक्य; 'वंचित बहुज आघाडी'च्या युतीबाबत सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

...तर चर्चा शक्य; 'वंचित बहुज आघाडी'च्या युतीबाबत सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

शरद पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 29 जानेवारी : काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावर शनिवारी कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जेव्हा भेटतील तेव्हा यावर चर्चा होईल, कोणी काही प्रस्ताव आणला तर वरिष्ठ स्थरावर युतीबाबत चर्चा होऊ शकते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जेव्हा भेटतील तेव्हा यावर चर्चा होईल, कोणी काही प्रस्ताव आणला तर वरिष्ठ स्थरावर युतीबाबत चर्चा होऊ शकते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाला देखील टोला लगावला आहे. ते रोजच आरोप करत आहेत, त्यांना सत्तेत येऊन सहा महिने झाले, मात्र काम काहीच केलं नाही. स्वत:कडे सांगण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे रिवाईंड आणि प्लेच काम ईडी सरकारकडून सुरू असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

हेही वाचा : सिद्धिविनायक मंदिर प्रकरण: बांदेकरांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; किल्लेदारांना दिला इशारा

शरद पवार काय म्हणाले? 

शनिवारी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते, यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया दिल्या, यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीबाबत असलेली राष्ट्रवादीची भूमिका देखील स्पष्ट केली. युतीबाबत आमच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच युतीसंदर्भात अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नसताना चर्चा कशी करणार? असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

First published:

Tags: NCP, Prakash ambedkar, Sharad Pawar, Supriya sule