भारुडात करायचा 'स्त्री' भूमिका! नेहमी चिडवायची मुलगी, 'कंचना' सिनेमा पाहून रचला हत्येचा कट

भारुडात करायचा 'स्त्री' भूमिका! नेहमी चिडवायची मुलगी, 'कंचना' सिनेमा पाहून रचला हत्येचा कट

  • Share this:

जुन्नर, 30 जुलै: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील थोपटवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र करून हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी हा नात्यातीलच आहे. मुलगा भारुडात 'स्त्री' भूमिका करत होता. मात्र, मुलगी त्याला चिडवायची. वाईट बोलायची. याचा राग मनात ठेऊन  आरोपीनं टीव्हीवरील 'क्राइम पेट्रोल', 'सावधान इंडिया' या मालिका तसेच 'कंचना' सिनेमा पाहून मुलीची हत्या केली.

हेही वाचा...धक्कादायक! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या, मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ

नात्यातीलच एका तरुणानं अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून तिची हत्या केली. धक्कादायक म्हणजे आरोपी तरुण साळसूद पणाचा आव आणत तपास करणाऱ्या पोलिसांसोबत व पीडित मुलीच्या कुटुंबात वावरत होता. विशेष म्हणजे पीडित कुटुंबीयांच्या भेटीला आलेल्या विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासमोर बसला होता. मात्र, आरोपी तरुणाचा साळसूदपणा जास्त वेळ टिकून राहिला नाही. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी तरुणाच्या हातात बेड्या ठोकल्या. चाकण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मृत मुलगी आपल्याला वाईट बोलली होती. त्याच रागातून आरोपीनं तिची हत्या केल्याची कबुली त्यानं दिली आहे.

दरम्यान, भामा आसखेड परिसरात 24 जुलैला दुपारी तीन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करुन तिला विवस्त्र करून तिचा मृतदेह झाडाझुडुपांत फेकण्यात आला होता. या प्रकरणी चाकण पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला. अखेर आरोपी नात्यातीलच निघाला. आपल्या नेहमीच वाईट बोलते, याचा राग मनात धरून नात्यातील अल्पवयीन मुलानंच मुलीची हत्या केल्याचं तपासात समोर आलं.

भारुडामध्ये करायचा 'स्त्री' भूमिका...

संबधित आरोपी हा भारुडामध्ये स्त्री भूमिका करत असल्याने ही मयत मुलगी त्याला त्यावरून वाईट बोलत होती. त्यामुळे अपमानीत झाल्याने टीव्हीवरील 'क्राइम पेट्रोल', 'सावधान इंडिया' या मालिका आणि 'कंचना' हा दक्षिण भारतीय चित्रपट पाहून संबधित मुलीला ठार मारण्याचा आरोपीने कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी या हत्या प्रकरणात संशयीत म्हणून तिघांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा...अरे देवा! कोरोनापासून वाचण्यासाठी तरुणानं बनवलं फुग्याचं कवच, VIDEO VIRALअल्पवयीन तरुणीच्या हत्येप्रकरणी संबधित मुलगा घटनास्थळी पोलिसांसमवेत फिरत होता. हत्येच्या घटनास्थळाची माहिती पोलिसांना देत असताना या तरुणाच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्याने गुन्ह्याची अखेर कबुली दिली असून चाकण पोलिस पुढील तपास करत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: July 30, 2020, 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading