अरे देवा! कोरोनापासून वाचण्यासाठी तरुणानं बनवलं फुग्याचं कवच, VIDEO VIRAL

अरे देवा! कोरोनापासून वाचण्यासाठी तरुणानं बनवलं फुग्याचं कवच, VIDEO VIRAL

कोरोनाला टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सचं पालन करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै: कोरोनानं मुंबई पुण्यातच नाही जगभरात थैमान घातलं आहे. या कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सचं पालन करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत. कुठे टेडीबेअरचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग बाळगलं जात आहे तर कुठे टोपी आणि बुटांचा वापर करून. काहींनी तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भन्नाट जुगाडही केले आहेत.

असाच एक जुगाड सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं तरुणानं फुग्यामध्ये स्वत:ला बंद केलं आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी या तरुणानं फुग्याचा अनोख्या पद्धतीनं वापरल केला आहे. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचा-5 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, दुर्घटनेचा LIVE VIDEO

ऑस्ट्रेलियाच्या बेलग्रेडमध्ये एका व्यक्तीने कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी भन्नाट युक्ती वापली. ज्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले. या माणसानं एअर असलेल्या बलूनमध्ये स्वत:ला बंद करून घेतलं आणि हा बलून रस्त्यावरून जात असताना लोकांनी घाबरून ओरडायला सुरुवात केली. काहींना ही गंमत वाटली ते हसायला लागले हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 30, 2020, 11:00 AM IST
Tags:

ताज्या बातम्या