धक्कादायक! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या, मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ

धक्कादायक! अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची आत्महत्या, मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ

'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि नवोदित कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

  • Share this:

नांदेड, 29 जुलै: 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि नवोदित कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आशुतोष यानं काही मराठी चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आशुतोष भाकरे यानं आत्महत्या केल्यानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  आशुतोष भाकरे याने ने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात काम केलं आहे.

हेही वाचा...मोठी बातमी! कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 31 वर्षात पुणे फेस्टिव्हलला पहिल्यांदा ब्रेक

व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो?

मिळालेली माहिती अशी की, आशुतोष हा गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. आशुतोष याने काही दिवसांपूर्वी 'फेसबुक'वर एक व्हिडीओ शेअर केला होता. व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत या व्हिडीओत विश्लेषण करताना दाखवण्यात आलं आहे. मात्र, आशुतोष आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेईल, अस कुणाला वाटलंही नसेल.

आशुतोष आणि मयुरी देशमुख 21 जानेवारी 2016 रोजी लग्नबंधनात अडकले होते. 2017 साली मयुरीने ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने एका प्रसिद्ध वृत्तपत्रात दोघांची लव्हस्टोरी प्रकाशित झाली होती.

हेही वाचा..."सुशांतची गॅझेट्स अजूनही रियाकडेच", पुराव्यानिशी कंगनाने केले खळबळजनक आरोप

पत्नी प्रसिद्धीच्या झोतात...

मयुरी देशमुख ही ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. मयुरी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तिचे 'तिसरे बादशहा हम हे' नाटक सुरु होते. याशिवाय 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', '31 दिवस' अशा काही चित्रपटात तिनं भूमिका साकारली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 29, 2020, 7:16 PM IST

ताज्या बातम्या