पुणे, 2 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच नेते मंडळी आणि राज्यभरातील कार्यकर्ते हे भावूक झाले असून शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात येत आहे. तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी यांच्याकडून पवार यांची मनधरणी सुरू असून आता पवार यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. पुण्यातील एका कार्यकर्त्याने तर चक्क स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून साहेब आपण निर्णय बदलावा अस म्हटल आहे.
पुण्यातील कार्यकर्त्याचे शरद पवारांना रक्ताने पत्र..#pune #sharadpawar pic.twitter.com/f9Z94ksbNx
— News18Lokmat (@News18lokmat) May 2, 2023
साहेब प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काळे याने आपल्या स्वतः च्या रक्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. साहेब आपण घेतलेला हा निर्णय कोणालाच मान्य नसून आपल्या या निर्णयाने आम्ही पोरके झाले असून आपण आमचे दैवत असून आपण हा निर्णय बदलावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. वाचा - Sharad pawar : सिल्व्हर ओकवरून महत्त्वाची बातमी, पवारांनी आपल्या निर्णयाबद्दल दिला निरोप पुढचा अध्यक्ष कोण? पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आता नवा अध्यक्ष कोण होणार यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. या सोहळ्यात शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे. वाचा - ‘हे अनपेक्षित नाही तर..’ शरद पवारांच्या निवृत्तीवर ठाकरे गटातून पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत म्हणाले तर, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना सुनावताना म्हटलं की, साहेबांच्या डोळ्यादेखत अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको? साहेब देशात, महाराष्ट्रात फिरणारच आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला असणारच आहे. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत असं नव्हे. शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे. भावनिक होऊ नका. आपण नव्या अध्यक्षाच्या पाठीशी उभे राहू असं आवाहन अजित पवार यांनी केलं.