पुण्यात कोरोनाबाबत स्थिती का बिघडतेय? काय चुकतंय? शरद पवारांनी घेतली शाळा!

पुण्यात कोरोनाबाबत स्थिती का बिघडतेय? काय चुकतंय? शरद पवारांनी घेतली शाळा!

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाबत स्थिती का बिघडत आहे, कुठे काय चुकत आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली.

  • Share this:

पुणे, 4 सप्टेंबर: कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये चिंता वाढली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाबत स्थिती का बिघडत आहे, कुठे काय चुकत आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी, प्रशासकीय गलथानपणा याबाबतही शरद पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची शाळा घेत त्यांची चांगलीच कान उघाडणी केली.

हेही वाचा...पंगा घेऊ नकोस! मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळेललं सहन करणार नाही, मनसेची धमकी

बारामती हॉस्टेलवर झालेल्या या बैठकीला शरद पवार यांच्यासह केंद्रीय नेते प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या का वाढतेय? असा शरद पवार यांनी जाब विचारला. पत्रकार मृत्यू प्रकरण, त्याचबरोबर जम्बो कोविड सेंटरबाबत का त्रुटी आहेत, याबाबतही विचारणा केली आणि सूचना केल्या.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांची तातडीनं बैठक बोलावली. कोरोनाबाबत पुण्यात स्थिती का बिघडतेय हे जाणून घेण्यासाठी ही बैठक होती.

काय म्हणाले सौरभ राव?

देशात सर्वाधिक रुग्ण संख्या पुणे जिल्ह्यात आहेत. तरी घाबरून जायचं कारण नाही. कारण बरे होण्याचं प्रमाण पण अधिक आहे. चाचण्यांचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त सौरव राव यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा...कंगनावर संतापले मराठी कलाकर, सोशल मीडियावरून केला टीकेचा भडिमार

उद्या दिवसभरात 4 बैठका

त्याचबरोबर उद्या (5 सप्टेंबर) पुणे शहर, पुणे ग्रामीण, पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्यात येणार आहे. उद्या दिवसभरात 4 बैठका घेण्यात येणार आहेत. कोरोनाबाबत काय चुकतंय, काय रणनीती असावी यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. विविध वृत्तपत्रांच्या वरिष्ठ संपादकांसोबतही शरद पवार बैठक घेणार आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 4, 2020, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading