Home /News /pune /

Sambhaji Raje: संभाजीराजेंकडून 'स्वराज्य' संघटनेची घोषणा, संघटनेचं चिन्ह आणि रंगाबाबत राजेंनी काय म्हटलं, वाचा...

Sambhaji Raje: संभाजीराजेंकडून 'स्वराज्य' संघटनेची घोषणा, संघटनेचं चिन्ह आणि रंगाबाबत राजेंनी काय म्हटलं, वाचा...

संभाजीराजेंकडून नव्या संघटनेची घोषणा, संघटनेचं नाव, चिन्ह आणि रंगाबाबत राजेंनी काय म्हटलं, वाचा...

संभाजीराजेंकडून नव्या संघटनेची घोषणा, संघटनेचं नाव, चिन्ह आणि रंगाबाबत राजेंनी काय म्हटलं, वाचा...

Sambhaji Raje Press Conference: संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी संभाजीराजे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

    पुणे, 12 मे : संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद (Sambhaji Raje Press Conference in Pune) घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे काय भूमिका मांडतात? काय घोषणा करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर पत्रकार परिषदेतून संभाजीराजे यांनी दोन मोठ्या घोषणा (Sambhaji Raje announced two big decisions) केल्या आहेत. संभाजीराजे म्हणाले, दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यापैकी पहिला निर्णय राज्यसभ्येच्या संदर्भातील आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिलं तर जूनमध्ये 6 जागा रिक्त होत आहेत. यापूर्वी 3 जागा भाजप 1 जागा राष्ट्रवादी,1 सेना ,1 काँग्रेस अशी होती. आता समीकरण बदललं भाजपला दोन, काँग्रेसला 1, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा, उरलेली 1 जागा आहे. मी निवडणूक लढवणार आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. 42 मताचा कोशंत पूर्ण करावा लागेल, 28 मत शिल्लक आहेत ...आता राजकीय पक्षांनी ठरवावं. अपक्ष म्हणून सर्वांनी पाठिंबा द्यावा. जे छोटे मोठे पक्ष आहेत ज्यांना व्हीप नाही त्यांनी जाहीर भूमिका घेत मला समर्थन द्यावं. आपण मला राज्यसभेत पाठवावं म्हणून मी सर्वपक्षांना विनंती करु इच्छितो. मी स्पष्टपणे सांगतो की, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी आजपासून कुठल्याही पक्षाचा सदस्य नाहीये. दुसरी घोषणा अशी की, स्वराज्य नावाची संघटना आपण स्थापन करत आहोत. शिवाजी महाराज, शाहू महाराजांवर प्रेम करणाऱ्यांना एका छता खाली आणायचा प्रयत्न आहे, समाजाला नवी दिशा देण्यासाठी, अन्याय होत असेल तिथे अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, शिवाजी महाराज, शाहु महाराजांचे नाव जगभरात पोहोचवण्यासाठी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करत आहोत असं संभाजीराजेंनी म्हटलं. स्वराज्य संघटनेचा प्रसार होण्यासाठी, स्वराज्य संघटीत करण्यासाठी मी लवकरच.. या महिन्यातच महाराष्ट्राचा दौरा करणार, लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, लोकांना विश्वासात घेण्यासाठी आणि लोकांना स्वराज्यच्या नावाखाली संघटीत करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना झाल्याचं मी जाहीर करतो. वाचा : नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, केवळ हेडलाईन मिळवण्यापुरतं : अजित पवार अनेकांची इच्छा होती की, वेगळा पक्ष स्थपान करायला हवा. त्यांचा मी आदर करतो. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून संपर्क केला. अनेकांचं म्हणणं होतं स्वतंत्र पक्ष स्थापन करा. मी या सर्वांचा आदर करतो. माझ्या वाटचालीचा पहिला टप्पा असणार आहे की, स्वराज्य संघटीत करावे. स्वराज्य संघटीत करत असताना आपण ज्यापद्धतीने प्रेम दिलं, ताकद दिली... ही संघटना, स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी काही वावगं समजू नये आाणि माझी त्याला तयारी सुद्धा आहे. स्वराज्य संघटनेचा झेंडा, रंग काय? संभाजीराजे यांनी म्हटलं, संघटनेचं चिन्ह अद्याप काही ठरवलेलं नाहीये. रंग कुठला ते सुद्धा ठरेवलेलं नाहीये. ज्यावेळी दौरा करेल त्यावेळी नागरिक सुचवतील हा रंग घ्या, हे चिन्ह घ्या. पण रक्तात आणि ह्रदयात हा केशरी पट्टा तर कुणी काढू शकत नाही.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Pune, Sambhajiraje chhatrapati

    पुढील बातम्या