Home /News /mumbai /

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्या नाना पटोलेंचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्या नाना पटोलेंचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार

नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, केवळ हेडलाईन मिळवण्यापुरतं : अजित पवार

नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, केवळ हेडलाईन मिळवण्यापुरतं : अजित पवार

अजित पवार म्हणाले, काँग्रेसला काँग्रेस पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पक्ष वाढवण्याचा आणि शिवसेनेला सुद्दा शिवसेना वाढवण्याचा अधिकार आहे.

    मुंबई, 12 मे : गोंदिया जिल्हा परिषदेच्या (Gondia Zilla Parishad) अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी बरोबर अभद्र युती केली आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक होत आपली नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला असं विधान नाना पटोले यांनी केलं. नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानाचा अजित पवारांनी (Ajit Pawar) चांगलाच समाचार घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं की. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. वास्तविक नाना पटोले यांचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं. कारण नानाच यापूर्वी कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले हे तुम्हाला माहिती आहे. मग आता भाजपने म्हणायचं का की, आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते तिकडे गेले. हे तेवढ्या पुरतं हेडलाईन मिळवण्यापूरता पाठीत खंजीर खुपसला वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल. पण संघटनेत प्रत्येक पक्ष आपआपल्या परीने काम करत असतो. आपलं महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आहे. यापूर्वीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र काम करत होतं. पण राज्यस्तरावर, देशस्तरावर निर्णय घेताना राज्यपातळीवरचे, देशपातळीवरचे नेते निर्णय घेतात. तिथली राजकीय परिस्थिती, तिथलं वातावरण पाहून सर्वच राजकीय पक्ष निर्णय घेतात. काँग्रेसने सुद्धा काही ठिकाणी तालुका, जिल्हास्तरावर भाजपसोबत हातमिळवणी केली. मी त्याला फार महत्त्व देऊ इच्चित नाही. जबाबदार व्यक्तींनी वक्तव्य करत असताना आपस्या वक्तव्याचा कुठंकाही वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही याबाबतही काळजी घेणं आवश्यक आहे असंही अजित पवार म्हणाले. वाचा : संभाजीराजेंनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, पुण्यातून केली मोठी घोषणा अजित पवार पुढे म्हणाले, काँग्रेसला काँग्रेस पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पक्ष वाढवण्याचा आणि शिवसेनेला सुद्दा शिवसेना वाढवण्याचा अधिकार आहे. आत्ताच्या घडीची परिस्थिती लक्षात घेता तिन्ही पक्ष एकत्र आले तरच बहुमताचा 145 चा आकडा पार करता येतो. सरकारमध्ये राहून जनतेची कामे करत येतात. राज्यस्तरावर आमची पवारसाहेबांनी मध्यंतरी बैठक घेतली तेव्हा आम्हाला सांगितलं की, आपली आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवायची आहे पण जिल्ह्याच्या स्थरावर काही वेगळे प्रश्न असतील तर तेथील निर्णय आमचे स्थानिक नेते घेऊ शकतात त्याबाबत मुभा देण्यात आली आहे. वाचा : संभाजीराजेंकडून नव्या संघटनेची घोषणा, संघटनेचं नाव, चिन्ह आणि रंगाबाबत राजेंनी काय म्हटलं, वाचा... 1999 ते 2014 या काळात 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचं सरकार चालवलं. त्या काळातही काही जिल्ह्यांत आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहायचो. काही ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घ्यायचो. जर एखादी व्यक्ती गैरसमज झाल्याने राष्ट्रवादी पक्ष सोडून इतर पक्षात जाण्यापेक्षा आघाडीतील मित्र पक्षात घेल्याने काही वाईट होत नाही. तसंच त्यांच्या पक्षातील काही नेते विरोधी पक्षात न जाता आघाडीतील पक्षात गेले तर त्यांनी समंजस्याची भूमिका घेतली पाहिजे असंही अजित पवार म्हणाले. अजित पवार पुढे म्हणाले, 1999 च्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे होतो. 2014 ला सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभे होतो. आम्ही कधी म्हणत नाही की, याने पाठीत कंजीर खुपसला आणि याने तलवार खुपसली. नाना पटोलेंनीच सागावं ते आधी काँग्रेसमध्ये होते मग भाजपत गेले त्याननंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आपलं आपलं.. झाकली मुठ सव्वा लाखाची सर्वांनी आपली ठेवावी.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Ajit pawar, Nana Patole, NCP

    पुढील बातम्या