पुणे, 31 जुलै : संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं हे संकट म्हणजे खरंतर माणूसकीची परीक्षा आहे. या दरम्यान, अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. अशीच एक काळजाला घर करणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांची असमर्थता दाखवली. अखेर सरपंचाने मुखाग्नी दिल्याचं समोर आलं आहे.
कोरोनामुळे रक्ताची नाती दुर झाली. मात्र, गावचा सरपंचाने पुढे येऊन सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचा प्रकार पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडला आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नाते श्रेष्ठ असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याने या दोन्ही मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी असमर्थता दाखवली.
कोरोनाच्या संकटात राज्यभर होणार तीव्र आंदोलन, 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार
यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न होता. यासाठी खुद्द मंचरचे सरपंच दत्ता गांजळे पुढे आले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतः हॉस्पिटलमधून दोन्ही मृतदेह घेऊन या दोन्ही मृतांवर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.
पुढच्या 8 दिवसांत कोरोना हरवण्यासाठी पुणे होणार सज्ज, मुख्यमंत्र्यांनी दिला आदेश
मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय
दत्ता गांजळे यांच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतूक होत आहे. कोरोनाच्या संकटाचा लढा देण्यासाठी संपूर्ण जगातील व्यवस्था कामाला लागली आहे. आरोग्य व्यवस्था रुग्णांसाठी दिवस रात्र काम करत आहे. पोलीस कर्मचारी ते नेते मंडळी कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी झटत आहे. अशात आपणही माणूसकी विसरून चालणार नाही. आपल्या देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी सगळ्यांना मदत करणं आणि त्यांच्यासाठी उभं राहणं महत्त्वाचं आहे. हाच एक मौल्यवान संदेश दत्ता गांजळे यांनी त्यांच्या कामातून दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Pune, Pune news