पुणे, 31 जुलै : कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात हाहाकार सुरूच आहे. अशात कोरोना रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात कोरोनाला हरवण्यासाठी बीकेसीच्या धर्तीवर पुण्यातही सीओईपी कॉलेजच्या ग्राऊंडवर जम्बो कोविड हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. साधारण 1 हजार बेड्सचं हे हॉस्पिटल असणार असल्याची महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
हे हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रशासनानं 21 दिवसांचा वेळ मागितला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 8 दिवसात हे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जंबो कोविड रुग्णालय उभारण्यास 21 दिवस लागतील, असं अधिकाऱ्यांनी सांगताच तोवर स्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे आठ दिवसांत त्याची उभारणी करा असं मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं आहे.
पुण्यात जुलैमध्ये दिसला कोरोनाचा हाहाकार, लॉकडाऊन असूनही धक्कादायक आकडेवारी समोर
जंबो कोविड रुग्णालये उभारण्यासाठी महापालिकेला आवश्यक तो निधी दिला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये कोविड दक्षता समित्या स्थापन करा, प्रयोगशाळांनी चाचण्यांचे अहवाल रुग्णांकडे न देता महापालिकेकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी कालच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या आहेत.
मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार, पालिकेने घेतला मोठा निर्णय
एका मुलासह 2 मुलींनी क्षणात गमावला जीव, खेळताना घडली धक्कादायक घटना
जुलै महिन्यात वाढले सर्वाधिक रुग्ण, ऑगस्टमध्ये आणखी वाढणार...
दरम्यान, पुण्यात जुलै महिन्यात करोना संसर्ग सर्वाधिक वाढला आहे. एकट्या जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यात तब्बल 55,584 नवे करोनाचे रुग्ण सापडले आहेत. आधीच्या संख्येपेक्षा हा आकडा मोठा आहे. तर ऑगस्टमध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 30 जून या दिवशी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 22,429 एवढी होती. तर 29 जुलै या दिवशी जिल्ह्यातील रुग्णसंख्या 78,013 एवढी झाली. म्हणजेच एकट्या जुलै महिन्यात जिल्ह्यातील नवीन 55,584 जणांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Pune, Pune news