टाटांचे मोबाइल पेट्रोल पंप लॉकडाऊनमध्ये हिट,पुण्याच्या स्टार्टअपमुळे 90 शहरात घरपोच मिळतंय इंधन

टाटांचे मोबाइल पेट्रोल पंप लॉकडाऊनमध्ये हिट,पुण्याच्या स्टार्टअपमुळे 90 शहरात घरपोच मिळतंय इंधन

टाटांची ही कंपनी मोबाइल पेट्रोल पंप म्हणजे घरपोच पेट्रोल देण्याच सुविधा उपलब्ध करून देते. या वेगळ्या होम डिलिव्हरीमुळे या कंपनीची मागणी वाढू लागली आहे.

  • Share this:

पुणे, 20 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या देशव्यापी लॉकडाऊननंतर पेट्रोल-डिझेलची मागणी झपाट्याने कमी झाली आहे. मात्र या काळात टाटांचा पाठिंबा असणाऱ्या एका स्टार्टअप कंपनीचा मोठा फायदा झाला आहे. टाटांची ही कंपनी मोबाइल पेट्रोल पंप म्हणजे घरपोच पेट्रोल देण्याच सुविधा उपलब्ध करून देते. या वेगळ्या होम डिलिव्हरीमुळे या कंपनीची मागणी वाढू लागली आहे. रिपोज एनर्जी असं या कंपनीचं नाव असून ती पुण्यामध्ये आहे. आता 300 हून अधिक मोबाइल पेट्रोल पंप उपलब्ध करत ही कंपनी 90 शहरांपर्यंत पोहोचली आहे.

(हे वाचा-कोरोनाच्या विळख्यामुळे कच्च्या तेलाने गाठला निच्चांक, किंमत आणखी उतरण्याची भीती)

रिपोज एनर्जीच्या सह-संस्थापक आदिती भोसले वळूंज (Aditi Bhosale Walunj) यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊननंतर त्यांच्या व्यवसायामध्ये 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांच्या या योजनेतून ग्राहक इंधनाची ऑर्डर मोबाइल अॅपच्या साहाय्याने करू शकतात. त्यांनी अनेक पेट्रोल पंपांबरोबर करार देखील केला आहे. मोबाइल डिस्पेन्सर आणि 6000 लीटर इंधन टँकबरोबर इंधन वितरण वाहनाचा वापर करून ग्राहकांपर्यंत इंधन पोहोचवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

(हे वाचा-अक्षय तृतीयेआधी खरेदी करा स्वस्त सोनं, आजपासून मोदी सरकारची विशेष ऑफर)

500 ते 2000 लीटर पेट्रोल रोज हॉस्पिटल्सपर्यंत पोहोचत आहे. भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील जवळपास डझनभर रुग्मालयांमध्ये पेट्रोल पोहोचवले जात आहे. डिझेल सेवा प्रदान करण्यासाठी रोटेशनमध्ये 4 कर्मचारी काम करतात. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीचे पालन होत असल्याची माहिती भोसले यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी संपर्करहित वातावरणात काम सुरू असल्याचं त्या म्हणाल्या.

(हे वाचा-3 मेनंतर सुद्धा रेल्वे सुरू होण्याची शक्यता धूसर, एअरलाइन्सचं बुकिंगही थांबवलं)

राष्ट्रीय सूचना केंद्र (एनआयसी), पुण्यातील महत्त्वाची रुग्णालयं आणि पुणे महापालिका त्याचप्रमाणे पुण्यातील इतर संस्थांना या स्टार्ट अपमधून इंधन पोहोचवण्याचे काम सुरू आहे. कोलकाता, सिलीगुड़ी, जमशेदपुर, कोटा, नागपूर या आणि इतर 90 शहरांमध्ये मोबाइल पेट्रोल पंपची सेवा रिपोज एनर्जीकडून पोहोचवण्यात येत आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First Published: Apr 20, 2020 02:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading