मराठी बातम्या /बातम्या /मनी /कोरोनाच्या विळख्यामुळे कच्च्या तेलाने गाठला 21 वर्षातील निच्चांक, किंमत आणखी उतरण्याची भीती

कोरोनाच्या विळख्यामुळे कच्च्या तेलाने गाठला 21 वर्षातील निच्चांक, किंमत आणखी उतरण्याची भीती

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे तेलाचे भाव गडगडले आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत किंमतींवरही होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे तेलाचे भाव गडगडले आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत किंमतींवरही होण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण आणि भंडारण क्षमता नसल्या कारणाने अमेरिकन कच्च्या तेलाने दोन दशकातील निच्चांक गाठला आहे.

नवी दिल्ली, 20 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण आणि भंडारण क्षमता नसल्या कारणाने अमेरिकन कच्च्या तेलाने दोन दशकातील निच्चांक गाठला आहे. अमेरिकन कच्च्या तेलाचे भाव 15 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. आशियायी बाजारात सुरुवातीच्या कारभारात अमेरिकन मानक वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI)ची किंमत 19 टक्क्यांपेक्षा अधिक किंमतीने घसरून 14.73 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर यामध्ये काहीशी सुधारणा होत दर 15.78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत.

(हे वाचा-अक्षय तृतीयेआधी खरेदी करा स्वस्त सोनं, आजपासून मोदी सरकारची विशेष ऑफर)

आंतरराष्ट्रीय मानक असणारा ब्रेंट क्रूड (Brent Crude) 4.1 टक्क्यांनी घसरून 26.93 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर यामध्ये सुधारणा होत दर 28.11 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. लॉकडाऊनमुळे जगभरातील कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वारंवार घट होत आहे. कच्च्या तेलाच्या कपातीमध्ये सौदी अरेबिया रूसमध्ये एकमत देखील झाले नाही. परिणामी सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये प्रति दिन 1.20 कोटी बॅरल एवढी वाढ केली आहे.

(हे वाचा-कोरोनामुळे अगणित आर्थिक नुकसान! 3 मेपर्यंत GoAirचे 90% कर्मचारी बिनपगारी रजेवर

गेल्या आठवड्यामध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील ओपेक आणि रुसच्या नेतृत्वाखाली गैर-ओपेक तेल उत्पादक देशांनी पुढील दोन महिन्यांसाठी तेल उत्पादनामध्ये प्रति दिन 97 लाख बॅरल कपात करण्याचा करार केला होता. सौदी अरेबिया आणि रूसमध्ये असणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमत युद्धामुळे तेलाचे कमी होणारे दर थांबवणे हा यामागचा उद्देश होता. कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये करण्यात आलेल्या कपातीनंतर सुद्धा तेलाची कमी होणारी किंमत थांबवता आली नाही. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक व्यवहार ठप्प आहेत परिणामी कच्च्या तेलाची घसरण सुरूच आहे.

(हे वाचा-3 मेनंतर सुद्धा रेल्वे सुरू होण्याची शक्यता धूसर, एअरलाइन्सचं बुकिंगही थांबवलं)

गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या एका अहवालानुसार असा अंदाज बांधण्यात येत आहे की, जर ओपेक प्लस देशांची बैठक दीर्घ काळासाठी पुढे ढकलली गेली तर कच्च्या तेलाच्या किंमती 10 डॉलर प्रति बॅरल पर्यंत देखील उतरू शकतात. कच्च्या तेलाचा जागतिक स्तरावर असणारा साठा त्याच्या मर्यादेपर्यंत भरून गेला आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: