नवी दिल्ली, 19 एप्रिल : देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे. 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले आहे. दरम्यान लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा देशातील ट्रेनची आणि हवाई वाहतूक सुरू होण्याची शक्यता कमी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रृप ऑफ मिनिस्टर्सच्या (GoM) बैठकीत अशी माहिती देण्यात आली की, याविषयी आरोग्य मंत्रालयाकडून माहिती घेतल्यानंतरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
(हे वाचा-20 एप्रिलपासून मोबाइल रिचार्जची दुकानं सुरू होणार? जाणून घ्या काय आहे योजना)
जीओएम प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्याच्या पक्षात नाही आहेत. रेल्वे सुरू झाल्यास सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडले जाण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे केंद्राकडून एअक इंडिया तसंच अतर एअरलाइन्सने सुद्धा 3 मेनंतर जर बुकिंग सुरू केले असल्यास ते रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेच.
ट्रेन सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार ट्रेन किंवा विमान सेवा पूर्ववत करण्याबाबत आता कोणताही निर्णय घेण्याचा विचार करत नाही आहे, या विषयावर चर्चा करणे व्यर्थ आहे. सरकारने विमान किंवा ट्रेनसेवा सुरू करण्यासाठी कोणती तारीख ठरवली आहे का, असा प्रश्न विचारला असता जावडेकरांनी असे उत्तर दिले की- 'एक ना एक दिवस या सेवा सुरू कराव्याच लागतील पण कधी ते नाही सांगू शकत. याबाबत चर्चा करणं व्यर्थ आहे कारण आपण जगाची स्थिती पाहतो आहोत आणि त्यातून धडा देखील घेत आहोत.'
फ्लाइट्सचे बुकिंग थांबवले
सरकारी क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडिया (Air India)ने शनिवारी घोषणा केली होती की, त्यांनी काही निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचे बुकिंग अनुक्रमे 4 मे आणि 1 जूनपासून सुरु करण्यात येईल. यावर नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले आहे की, सरकारने अद्याप फ्लाइट्स पुन्हा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सर्व एअरलाइन्सना असा आदेश देण्यात आला आहे की, जोपर्यंत सरकार फ्लाइट्स सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेत नाही, तोपर्यंत एअरलाइन्सनी कोणत्याही फ्लाइट्सचे बुकिंग सुरु करू नये.
संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus