पुणे, 05 मार्च : मागच्या चार दिवसांपूर्वी पुण्यातील दोन विधानसभेच्या पोटनिवडणुकांचे निकाल हाती आले. यामध्ये राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे तब्बल 10 मतांनी निवडून आल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा उमेदवार हेमंत रासने यांचा 10 हजार मतांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाने भाजपचा 28 वर्षांच्या गडाला सुरुंग लावला. दरम्यान रविंद्र धंगेकर यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली यावेळी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
रविंद्र धंगेकर यांची पार्श्वभूमी पाहिली गेल्यास ते पहिल्यांदा शिवसेना, मनसेनंतर काँग्रेसमध्ये आले आहेत. याचबरोबर रवींद्र धंगेकर मनसेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे. पण, 2019 साली धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
(मटण खाऊन मंदिरात प्रवेश केला का? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिले उत्तर)
त्यावेळी त्यांना आमदारकीची संधी मिळेल असे वाटत होत परंतु त्यांना संधी मिळाली नाही त्यांनी 2023 ला कसबा पेठ निवडणुक लढवली आणि त्यांची ताकद दाखवून दिली. विजयानंतर रवींद्र धंगेकर राज ठाकरे यांची भेट घेणार का? याबद्दल त्यांनी खुलासा केला. ते zee 24 तास या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी शिवसेनेत असताना दीपक पायगुडे यांच्यामुळे राज ठाकरेंकडे आकर्षित झालो. 10 वर्षे मनसेत नगरसेवक म्हणून काम केलो. पण, 2019 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही राज ठाकरे यांच्या मी संपर्कात होतो. मी राज ठाकरे यांचा कधी अनादर केला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सर्वांच्या हाताखाली काम केले आहे, असेही धंगेकर म्हणाले.
चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये वंचित फॅक्टरमुळे मविआचा पराभव? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
ठाकरे कुटुंब पूर्वीपासून माझ्या जवळचं आहे. आजही राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. शिवसेना आणि मनसे सोडली, पण त्यांच्यावर कधीही टीका केली नाही. कारण, कुटुंब म्हणून त्या परिवारात राहत होतो, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं. आमदार झाल्यावर राज ठाकरेंचा फोन आला होता का? असं विचारल्यावर धंगेकर म्हणाले, “राज ठाकरेंचा फोन आला नाही. पण, त्यांना भेटण्यास जाणार आहे,” असं धंगेकरांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune Bypoll Election, Raj Thackeray