मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मटण खाऊन मंदिरात प्रवेश केला का? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिले उत्तर

मटण खाऊन मंदिरात प्रवेश केला का? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिले उत्तर

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा आरोप विजय शिवतारेंनी केला.

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा आरोप विजय शिवतारेंनी केला.

सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असा आरोप विजय शिवतारेंनी केला.

पुणे, 05 मार्च : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मटन खाऊन मंदिरात गेल्याचा अजब आरोप केला आहे. पण, आपल्या असं काही वाचणात आलं नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी उत्तर देण्याचं टाळलं.

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केला. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असं म्हणत शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याबद्दल सुप्रिया सुळे यांना विचारले असता अवघ्या दोन शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली,

'मला काही माहिती नाही, माझ्या असं काही वाचनात आलं नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विजय शिवतारेंच्या आरोपांना उत्तर देण्याचे टाळलं.

'या देशामध्ये काय परिस्थिती आहे, यावर चर्चा झाली पाहिजे. पुढील आठवड्यात महागाई आणि बेरोजगारीवर चर्चा करत आहोत.. सगळ्या देशात काय परिस्थिती आहे यावरून कळते,बेरोजगारी आणि महागाई यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

'आमचे लोकशाहीचे विचार आमचे दडपशाहीचे विचार नाहीत, त्यामुळे सर्वांनी यात्रा काढावी, अशी प्रतिक्रिया भाजपच्या आशिर्वाद यात्रेवर दिली.

महाराष्ट्र सरकारने रेशीन दुकान बंद करण्याचा निर्णय सरकार घेतं आहे. असा जीआर सरकार काढणार आहे, रेशीन दुकान का बंद करत आहेत, कशासाठी आणि का बंद करत आहेत, षडयंत्र आहे का काही? असे काही प्रश्न उपलब्ध होत आहेत. यावर चर्चा व्हावी, गरिबांचं अन्न बंद होईल रेशीन दुकान बंद झालं तर , अशी टीकाही सुळेंनी केली.

विजय शिवतारेंनी काय केला आरोप

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, असं म्हणत शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे या दोन तरुणांशी संवाद साधत आहे. एका हॉटेलमधला हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही तरुणांनी मटन थाळी ऑर्डर केली होती, यावेळी, सुप्रिया सुळे यांनी या तरुणांशी बोलताना आपण सुद्धा अशीच थाळी खाली असं म्हटलं आहे.

हाच धागा पकडून शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांनी मटण थाळी खाऊन महादेव आणि सासवडला सोपणकाका मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पुण्यातील एका हॉटेलमध्ये आज मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केलं, असा आरोप केला आहे.

First published:
top videos