पुणे, 05 मार्च : पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाला वंचित आघाडी कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. पण, वंचितच्या भूमिकेमुळे मविआचा उमेदवार पडला या आरोपात काहीही तथ्य नाही, असा दावा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजय हा धंगेकरांचा आहे. पक्षाचा आहे असं मी मानत नाही. राष्ट्रवादीचा उमेदवार नाना काटे हे जर उभे राहिले नसते तर राहुल कलाटे निवडून आला असता अस का म्हणत नाही तुम्ही त्यामुळे वंचितच्या भूमिकेमुळे मविआचा उमेदवार पडला या आरोपात काहीही तथ्य नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
(मटण खाऊन मंदिरात प्रवेश केला का? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिले उत्तर)
औरंगजेब हे या मातीतले आहेत की नाहीत? तुम्हीच सांगा. ज्याला जाती धर्माचं राजकारण करायचं त्याला करू द्या. लोकच काय ते ठरवतील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
(ईडीची पिडा, हसन मुश्रीफ यांची हायकोर्टाने धाव)
11 मार्चला आंबेडकर लिखित प्रॉब्लम ऑफ रूपी या पुस्तकाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत या निमित खास कार्यक्रम आम्ही घेतोय. वाढती महागाई आणि रुपयाचं अवमूल्यन या विषयावर परिसंवाद घेणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 100 वर्षांपूर्वीच हा प्रॉब्लेम या पुस्तकातून मांडला होता. आजही तोच प्रॉब्लेम आहे. आरबीआय आजही त्यावर ठोस उपाय योजना शोधू शकलेली नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.