मराठी बातम्या /बातम्या /पुणे /जिम सुरू होताच पुण्याच्या डॉक्टरबाई जोमात, साडीवरच केला 'झिंगाट' वर्कआऊट; पाहा VIDEO

जिम सुरू होताच पुण्याच्या डॉक्टरबाई जोमात, साडीवरच केला 'झिंगाट' वर्कआऊट; पाहा VIDEO

मराठमोळ्या वेशात महिला डॉक्टरने जिममध्ये वर्कआऊट केलं आहे.

मराठमोळ्या वेशात महिला डॉक्टरने जिममध्ये वर्कआऊट केलं आहे.

मराठमोळ्या वेशात महिला डॉक्टरने जिममध्ये वर्कआऊट केलं आहे.

पुणे, 15 जून : राज्यात कोरोना नियंत्रणात आला आहे. यानंतर पॉझिटिव्ही रेटनुसार टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन हटवला जातो आहे. पुण्याचा पॉझिटिव्ही रेट कमी झाल्याने पुणेकरांना काही प्रमाणात मोकळा श्वास घेता येतो आहे. पुण्यात काही निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यानुसार जीमही सुरू झाली आहे. यानंतर पुण्याच्या एका फिटनेस फ्रिक डॉक्टर महिलेला (Pune doctor) इतका आनंद झाला की ती चक्क साडी नेसून जीममध्ये गेली. साडीवरच तिने वर्कआऊट (Pune woman workout in saree) केला आहे. तोसुद्धा झिंगाट गाण्यावर (Pune woman workout on zingaat song) .

लॉकडाऊन मुक्तता होताच अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यापैकीच एक आहेत पुण्यातील डॉक्टर शर्वरी इनामदार (Dr Sharvari Inamdar). डॉ. शर्वरी नियमितपणे वर्कआऊट करतात. कोरोना ल़ॉकडाऊनमुळे त्यांना जीममध्ये जाता येत नव्हतं. घरीच वर्कआऊट करावं लागत होतं. पण आता लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आणि जीम सुरू झाली. त्यानंतर त्या सर्वात आधी जीममध्ये गेल्या.

जीम म्हटलं जीमचे खास कपडे असतात. पण या डॉक्टरबाई चक्क साडी नेसून जीममध्ये गेल्या. अगदी नाकात नथ, हातात बांगड्या, गळ्यात हार, डोक्याला टिकली आणि काटपदरी साडी नेसून डॉ. शर्वरी जीममध्ये गेल्या. एखाद्या नवा सण आल्यानंतर जशी महिला नटते, उत्साहीत असते. अगदी तसाच उत्साह डॉ. शर्वरी यांना जीम सुरू झाल्यानंतर झाला आणि त्यामुळेच त्या जणू काही त्यांच्यासाठी हा सणच आहे, अशा नटूनथटून त्या जीममध्ये गेल्या. यावरूनच जिम सुरू झाल्याचा त्यांना किती आनंद होतो आहे ते दिसतं आहे.

हे वाचा - लग्नासाठी नाचत होती लेक, आईची सटकली आणि...; काय घडलं पाहा VIDEO

फक्त जीममध्ये गेल्या नाही तर त्यांनी सर्व वर्कआऊटही केले आहेत. एरवी साडी नेसणं आणि त्यावर वावरणं म्हणजे कित्येक महिलांसाठी कोणत्या आव्हानापेक्षा कमी नसतं. साडी नेसून साधं चालणं, उठणं-बसणंही अनेकांना शक्य होत नाही. पण या पुण्याचा डॉक्टर महिलेने मात्र साडीत चक्क वर्कआऊट करून दाखवला आहे. बरं आता इतका मराठमोळा साजेसह केलेल्या वर्कआऊटला चक्क मराठी गाण्याने साथ दिली. कोणत्या हिंदी किंवा इंग्रजी गाण्यावर नव्हे तर मराठी झिंगाट गाण्यावर त्यांनी हा जोशात वर्कआऊट केला आहे.

हे वाचा - डोनाल्ड ट्रम्पवर कुल्फी विकायची वेळ आली की काय? पाहा VIDEO आणि वाचा सत्य

डॉ. शर्वरी यांचा मराठमोळ्या वेशातील या झिंगाट वर्कआऊटचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Fitness, Pune, Viral, Viral videos, Workout