नवी दिल्ली, 15 जून : गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ (viral video) सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होतोय. यात एक माणूस गाणे म्हणत कुल्फी विकताना दिसून येतोय. त्यात हा माणूस हुबेहूब अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसारखा (Donald Trump) दिसतोय. त्यामुळे हे खरंच डोनाल्ड ट्रम्प आहेत की काय असं संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र आता या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य समोर आलं आहे. खरं म्हणजे या व्हायरल व्हिडिओतील माणूस डोनाल्ड ट्रम्प नाही तर पाकिस्तानातील (Pakistan) एक कुल्फीवाला आहे. या कुल्फीवाल्याचं नाव सलीम असं आहे. सध्या त्यांच्या कुल्फी विकण्याचा अंदाज प्रचंड व्हायरल होतोय. गाणं म्हणताना कुल्फी विकण्याचा सलीमचा व्यवसाय आहे.
हे वाचा - लग्नाच्या पहिल्याच रात्री संसार उद्धवस्त; शारीरिक संबंधादरम्यान पत्नीचा मृत्यू
हॅरिस अली नावाच्या एका युवकानं सलीम यांच्याबद्दल माहिती दिली आहे. साली डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला आले होते त्यानंतरच सलीमला सर्वजण डोनाल्ड ट्रम्प म्हणून चिडवू लागले. तसंच सलीम यांनाही त्यांना ट्रम्प म्हंटलेलं आवडतं. सलीम कुल्फीवाला अनेकांना माहिती आहे मात्र काही वर्षांआधी त्यांची निर्माण झालेली नवी ओळख त्यांना अधिक आवडते असं अलीनं म्हटलंय.
सलीम यांना आहे आजार सलीम यांना लोकं ट्रम्प म्हणून संबोधत असले तरी त्यांना एक जेनेटिक समस्या आहे. त्यांना अल्बिनिझम नावाचा आजार आहे. यामुळे त्यांचा चेहरा भुऱ्या रंगाचा झाला आहे आणि केसांचा रंगही बदलला आहे. तसंच त्यांची त्वचा खूपच सेन्सिटिव्ह झाली आहे. यामुळे उन्हात कुल्फी विकण्यासाठी बाहेर पडल्यावर त्यांना कदाचित त्रासही होत असेल. मात्र सलीम यांना ट्रम्प ही ओळख प्रचंड आवडल्याचं त्यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलंय.