मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नासाठी नाचत होती लेक, आईची सटकली आणि...; काय घडलं पाहा VIDEO

लग्नासाठी नाचत होती लेक, आईची सटकली आणि...; काय घडलं पाहा VIDEO

लग्नासाठी आपल्या आईला मनवणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे.

लग्नासाठी आपल्या आईला मनवणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे.

लग्नासाठी आपल्या आईला मनवणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे.

मुंबई, 14 जून :  अनेक फिल्म्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की हिरो-हिरोईन आपल्या आई-वडिलांना आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करून देण्यासाठी कसं मनवतात.  खऱ्या आयुष्यात मात्र आपल्या पालकांना आपल्या लग्नासाठी तयार करणं म्हणजे कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नाही. सध्या आपल्या लग्नासाठी आपल्या आईला मनवणाऱ्या अशाच एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे.

या तरुणीने आपल्या आईला लग्नासाठी मनवण्यासाठी चक्क फिल्मी गाण्याचा आधार घेतला आहे. ज्या गाण्यावर ती नाचत आपल्या आईला माझं लग्न करून दे असं सांगते आहे (Girl dance on song for marriage). आधीच कामात व्यस्त असलेली आई, लेकीला लग्नासाठी असं नाचताना पाहून भडकली आणि तिने काय केलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

View this post on Instagram

A post shared by Sushma Yadavvv (@sushma8408)

व्हिडीओत पाहू शकता एक तरुणी सुरुवातीला बसली आहे. गोविंदाच्या दुल्हे राजा या फिल्ममधील 'सुनो ससुरजी...'  हे गाणं लागते आणि ती नाचायला लागते. तिथं जवळच तिची आई काम करते आहे. ती आपल्या आईकडे जाते आणि या गण्यावर नाचू लागते. तिची आई सुरुवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखंच करते पण मुलीच्या अशा विचित्र वागण्याने तिला राग येतो आणि हसत हसतच ती लेकीच्या कानाखाली मारते.

हे वाचा - नवरी राहिली बाजूला मेहुणीने मारला चान्स; नवऱ्यासोबतचा VIDEO पाहून तुम्हीही उडाल

या मुलीचं नाव सुषमा यादव आहे. तिने स्वतःच आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आई माझंही लग्न करून दे असं तिनं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आलं असेल किंवा कदाचित तुम्हीसुद्धा असं कधीतरी केल्याचं तुम्हाला आठवलं असेल. हा मजेशीर व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

हे वाचा - नवरदेवाच्या मित्राचं स्टेजवर खोडसाळ कृत्य; गिफ्ट पाहून नवरीही लाजली, Video Viral

हा पण एक मात्र आहे. तुम्हालाही लग्नाची घाई असेल, पण आईला कसं सांगू असा प्रश्न पडला असेल तर या मुलीचा या हटके मार्ग तसा वाईटही नाही.

First published:

Tags: Funny video, Social media viral, Viral, Viral videos