पुणे, 15 नोव्हेंबर: कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन (Violating corona rules and regulation) केल्यानं पुण्यातील (Pune) प्रसिद्ध सारसबाग (Sarasbaug) अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागानं घेतला आहे. राज्य सरकारनं उद्यानं खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 10 वर्षांखालील मुले, 65 पेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिकही सारसबागेत येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. तसेच उद्यानांमधील व्यायामाचे साहित्यही वापरले जात असून उद्यानांमध्ये येणारे अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत, असं उद्यान विभागाचं म्हणणं आहे. सारसबागेसह हडपसरमधील आणखी एक बाग 14 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली आहे. हेही वाचा… Gold Investment: बँकेतून सोन्याची नाणी खरेदी करणं टाळा, वाचा काय आहे कारण याचबरोबर शहरातील इतर उद्यानांमध्येही कोरोना नियमांचं पालन होत नसल्याचं निदर्शनास आल्यास तीही उद्याने बंद करण्यात येतील, असा इशारा महापालिका प्रशासनानं दिला आहे. दरम्यान, पुणे शहरात लहान- मोठी अशी एकूण 204 उद्याने आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील उद्याने बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं मिशन बिगेन अगेन असं म्हणत राज्य सरकारनं अनेक महिन्यांपासून बंद असलेली उद्याने खुली केली. मात्र, नागरिकांकडून कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं आहे. पहिल्या टप्प्यात 81 उद्याने सुरू… महापालिकेनं 1 नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात 81 उद्याने खुली केली होती. मात्र, उद्याने सुरू करताना 10 वर्षांखालील मुले आणि 65 पेक्षा अधिक वय असणारे नागरिक, गर्भवती महिला, अन्य आजार या व्यक्तींना प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. तसेच मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून रखवालदारासोबत हुज्जत घातल्याचाही प्रकार सारसबागेत घडला होता. या सर्व सारसबाग अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. हेही वाचा.. बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग, फडणवीस पोहोचले बैठकीला! दगडूशेठ मंदिर तीन टप्प्यात सुरू होणार.. पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिर उद्यापासून (16 नोव्हेंबर) तीन टप्प्यात सुरू होणार आहे. त्यासाठी मंदिरात साफसफाई सुरू करण्यात आली आहे. तसंच सोशल डिस्टंसचं मार्किंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात गणेशभक्तांना फक्त दर्शन घेता येणार आहे.. हार तुरे नारळ असं पूजेचं कुठलंच साहित्य मंदिरात आणता येणार नाही. तसंच मास्कशिवाय भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती दगडूशेठ मंदिराचे सचिव महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.