जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Investment: बँकेतून सोन्याची नाणी खरेदी करणं टाळा, वाचा काय आहे कारण

Gold Investment: बँकेतून सोन्याची नाणी खरेदी करणं टाळा, वाचा काय आहे कारण

Gold Investment: बँकेतून सोन्याची नाणी खरेदी करणं टाळा, वाचा काय आहे कारण

सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी अनेकदा सोन्याच्या नाण्यांमध्ये (Gold Coins) गुंतवणूक करण्याला अधिक पसंती दिली जाते. हे अधिक फायद्याचे देखील आहे. सोन्याची नाण्यातून तुम्हाला गरज असेल तेव्हा रोख रक्कम मिळवता येईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: दीर्घ कालीन फायद्यासाठी सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक (Invesment in Gold) नेहमची उपयोगी ठरते. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याकरता तुम्ही गोल्ड ईटीएफ, सॉव्हरेन गोल्ड बाँड किंवा फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करताना तुमच्याकडे दागिने किंवा सोन्याची नाणी खरेदी करण्याचा पर्याय आहे. भविष्याचा विचार करता सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दागिन्यांऐवजी नाणी खरेदी करणे अधिक फायद्याचे आहे. सोन्याची नाण्यातून तुम्हाला गरज असेल तेव्हा रोख रक्कम मिळवता येईल. त्याचप्रमाणे यांची विक्री करताना मेकिंग चार्ज किंवा वेस्टेज चार्ज आकारला जाणार नाही. सोन्याची नाणी दागिन्यांप्रमाणे कालांतराने काळी नाही पडत. सोन्याची नाणी तुम्ही सराफाव्यतिरिक्त बँकांमध्ये खरेदी करू शकता. बँकेत तुम्हाला 99.9 शुद्द 24 कॅरेट सोन्याची नाणी मिळतील. बँकेत केवायसी अपडेटेड असेल तर कोणत्याही वेळी तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेतून सोन्याची नाणी खरेदी करू शकता. बँकांच्या वेबसाइटवरून देखील नाणी खरेदी करता येतात. मात्र ग्राहकांनी बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करणे टाळले पाहिजे. त्याऐवजी तुम्ही तुमच्या ओळखीच्या आणि विश्वासाच्या सराफाकडून नाणी खरेदी करणे केव्हाही चांगले. (हे वाचा- या दानशुराला सलाम! 2020 मध्ये अझीम प्रेमजी यांनी दररोज दान केले 22 कोटी) काय आहे कारण? बँकेत जी सोन्याची नाणी मिळतात ते खूप जास्त उच्च प्रतीची असतात. ही नाणी स्वित्झर्लंड किंवा अन्य पाश्चिमात्य देशातून आयात केली जातात. त्यामुळे बँकांकडून ही नाणी बाजार भावापेक्षा 7 ते 10 टक्के अधिक दराने विकली जातात. त्यामुळे गुंतवणुकीच्या हिशोबाने बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करणे फायद्याचे नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही परत ही नाणी बँकेकडे विकू शकत नाहीत. कारण बँक सोने खरेदीचा व्यवहार करत नाही. (हे वाचा- बँक खात्याशी संबंधित हे काम केलंय का? सीतारामन यांनी दिली मार्च 2021ची डेडलाइन) बँकेकडून खरेदी केलेली सोन्याची नाणी जर तुम्ही एखाद्या सराफाकडे विकायला गेलात तर तुम्हाला त्याचा बाजार भावच मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला या  नाण्याच्या बदल्यात सहज रोख रक्कम देखील उपलब्ध होणार नाही. कारण मोठे आणि विश्वासू सराफ सोन्याची नाणी घेऊन कॅश देत नाहीत. तुम्हाला ज्वेलरीमध्ये ही नाणी एक्सचेंज करावी लागतील. आपात्कालीन परिस्थितीत तुम्हाला ही नाणी एखाद्या लोकल सराफाकडे विकावी लागली तर त्याला हवी ती किंमत तो तुम्हाला देऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात