बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग, फडणवीस पोहोचले बैठकीला!

बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग, फडणवीस पोहोचले बैठकीला!

बिहारमध्ये आता सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. एनडीएने आज बैठक बोलावली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या  (bihar assembly election 2020)निकालात एनडीएने (NDA) बाजी मारली आहे. पण, बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. बिहारमध्ये आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे पाटन्यात दाखल झाले आहे.

बिहारमध्ये आता सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. एनडीएकडे स्पष्ट बहुमत आहे. पण, तरीही सत्ता स्थापन होईपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये धाकधुक वाढली आहे. एनडीएने आज बैठकीचे आयोजन केले आहे.

6 वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या, फुफ्फुस गायब; नग्न अवस्थेत सापडला मृतदेह

बिहारमधील सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा पाटण्यात दाखल झाले आहे. आजच्या एनडीएच्या बैठकीत फडणवीस हे सामील होणार आहे. या बैठकीमध्ये सत्तेबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज पाटन्यात भाजपच्या मुख्य कार्यालयात एनडीएची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभेच्या गट नेतेपदाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर एनडीएचे सर्व घटकपक्ष राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील.

दरम्यान, 16 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. 'मुख्यमंत्रिपदाची सूत्रं कुणाच्या हाती जाणार याबद्दल नितीश कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी सूचक विधान केले होते. 'मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण असेल याबाबत NDA निर्णय घेईल. मी त्यासाठी दावा केला नाही. NDA ची बैठक होणार असून त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल' असं नितीश कुमार म्हणाले होते.

VIDEO : कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टर-रुग्णांचं दिवाळी सेलिब्रेशन

'चिराग पासवान यांच्या पक्षानं बिहारमध्ये स्वतंत्र निवडणुका लढवल्यानं NDAला मोठा त्रास सहन करावा लागला. असं असलं तरीही NDA बहुमतानं बिहारमध्ये आलं आहे. त्यामुळे चिरागबाबत निर्णय देखील भाजपसह NDAनं घ्यावा, असंही नितीश कुमार म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: November 15, 2020, 11:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या