मुंबई/गोरखपूर, 30 जानेवारी : उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने डॉ. कफील खान यांना मुंबई येथून अटक केली. कफील खान यांना गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमधून निलंबित करण्यात आले होते. अलिगड मुस्लिम विद्यापीठात 12 डिसेंबर 2019 रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल भडकाऊ वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महत्त्वाचे म्हणजे बीआरडी कॉलेजमध्ये बाल मृत्यूच्या प्रकरणात 2017 मध्ये कफील खान यांना निलंबित करण्यात आले होते.
'संविधानावर आता नाही राहिला विश्वास '
डॉ. खान यांच्यावर आयपीसीच्या कलम 153-ए अंतर्गत सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना संबोधित करताना खान यांनी 'मोटाभाई' सर्वांनाच हिंदू किंवा मुस्लिम होण्यासाठी शिकवले आहे पण ते मनुष्य बनू नका असे शिकवत आहेत. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व असल्याने त्यांना घटनेवर विश्वास नाही. खान म्हणाले की, सीएए मुसलमानांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवते आणि एनआरसी लागू होताच लोकांना त्रास दिला जाईल.
Maharashtra: Uttar Pradesh Special Task Force arrested doctor Kafeel Khan from Mumbai.He was suspended from Gorakhpur's BRD medical college&is accused of making instigating remarks at Aligarh Muslim University (UP) during protest against Citizenship Amendment Act on 12 Dec,2019
— ANI (@ANI) January 29, 2020
'आपल्याला यासाठी लढण्याची गरज आहे'
खान त्यांच्या भाषण पुढे म्हणाले की, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. ती आपल्याला लढावीच लागेल. दाढी ठेवणारे लोक हे दहशतवादी असतात असे RSS शाळांमध्ये शिकवले जाते असा आरोप यावेळी खान यांनी केला. CAA कायदा लागू करून सरकारला सिद्ध करायचे आहे की भारत हा एक देश नाही आहे. अशा भाषणामुळे खान यांनी शांती भंग केल्याची त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.