कोरोना विषाणूमुळे Health Emergency, WHO ने बोलावली आपात्कालिन बैठक

कोरोना विषाणूमुळे Health Emergency, WHO ने बोलावली आपात्कालिन बैठक

इतर देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी चीनमधील हवाई वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे

  • Share this:

वुहान, 30 जानेवारी : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आज गुरुवारी आपात्कालिन बैठक बोलावली आहे. सध्या जगभरात कोरोना विषाणूमुळे भीतीचे वातावरण आहे. याचा फैलाव वाढू नये यासाठी तातड़ीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. चीनमध्ये आतापर्यंत या विषाणूमुळे 169 जणांचा मृत्यू झाला आहे. इतरही अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. संसर्गजन्य कोरोना विषाणूला आरोग्य आणीबाणी (Health emergency) जाहीर करण्यासंदर्भात आज जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. जागतिक आरोग्य संघटनेतील आरोग्य आणीबाणी प्रोग्रामचे मायकल रायन यांनी सांगितले की, जगभरातील जनतेला कोरोना विषाणूसंदर्भात सावधावतेचा इशारा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

चीनमधील हवाई वाहतूक सेवा बंद

चीनमध्ये सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या वादळामुळे हवाई वाहतूक कंपन्यांनी तेथून जाण्याऱ्या व चीनमध्ये येणाऱ्या अधिकतर विमानांना रद्द केलं आहे. इतर देशांमध्ये या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. आतापर्यंचत 18 देशांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात 68 प्रकरणं समोर आली आहेत.

देशात या आजारासंदर्भात 24X7 कॉल सेंटर सुरू करण्यात आला आहे. चीनमध्ये व्हायरसमुळे आतापर्यंत 169 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 800 रुग्ण संक्रमित आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील दोन्ही संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital)दाखल करण्यात आले होते. चीनमधील (China) करोना विषाणूमुळे आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये कोरोना विषाणूच्या तीन घटनांची पुष्टी झाली आहे. फ्रेंच आरोग्यमंत्री एग्नेस बुजिन यांनी सांगितले की, पहिले प्रकरण दक्षिण-पश्चिम शहरात आढळले आणि दुसरे प्रकरण पॅरिसमध्ये आढळले. त्याच वेळी, तिसरा व्यक्ती बळी पडलेला नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. असे म्हणतात की, हे तिन्ही रुग्ण चीनमधून परतले आहेत. तिन्ही रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

काय आहेत लक्षणं

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे तत्सम लक्षण दिसून येत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. मात्र नेहमीपेक्षा काही वेगळी वा तीव्र लक्षणे दिसून येत असल्यास तातड़ीने आपल्या जवळील सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधा.

चीनच्या अनेक शहरांमध्ये जाण्यास बंदी

कोरोना विषाणूमुळे चीनच्या शहरांवरील हालचालींवर पूर्णपणे बंदी घातली आहे. चीनमध्ये 41 मृत्यू व्यतिरिक्त 830 लोक संक्रमित आहेत. वुहानसह 9 शहरे बंद करण्यात आली आहेत. वुहानमध्ये 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी अभ्यास करतात. त्या संदर्भात चीनने प्रशासनाशी बोलणे केले आहे. यापूर्वी अहवालानुसार, चीनमधून परत आलेल्या दोन लोकांना कोरोना विषाणूची (Corona virus) लागण होण्याची भीती होती. या दोन्ही रूग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही रुग्णांमध्ये हलकी थंडी व सर्दीची लक्षणे आहेत. सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

First published: January 30, 2020, 8:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या