मुंबई, 16 एप्रिल : अभिनेत्री करिना कपूर बॉलिवूडच्या काही यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यामुळेच तिच्याशी संबंधीत कोणतीही गोष्ट चर्चेचा विषय ठरते. अशात अनेकदा तिच्या नखऱ्यांच्या चर्चा होत असतात. सध्या सोशलम मीडियावर सध्या करिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती तिच्या स्टाफला ओरडताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ करिना कपूरचा रेडिओ शो What Women Want च्या सेटवरील आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला करिना तिच्या स्टाफला कपमध्ये कॉफी जास्त टाकण्यासाठी बोलते. तर दुसऱ्या एका मुलीला ती तिला स्ट्रेस न देण्याविषयी सांगते. त्यानंतर कपडे नीट प्रेस न केल्यामुळे एका स्टाफ मेंबरवर चिडलेली पाहायला मिळत आहे. रामायणातील लव-कुश सध्या काय करतात? एक तर आहे प्रसिद्ध अभिनेता
करिना कपूरच्या या व्हिडीओवर युजर्सच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. जवळपास सर्वच युजर्सनी करिनावर टीका केली आहे. काहींनी म्हटलं आहे. प्रेमानं बोलायला पैसे लागत नाहीत. तर काहींना करिनाच्या या वागण्याला अॅटीट्यूड आणि ओव्हर अॅक्टिंगचं दुकान म्हटलं आहे. वेळ पडल्यास कर्ज काढेन पण स्टाफला पगार देईन, बॉलिवूड अभिनेत्याची घोषणा करिना असं वागण्याची खरं तर ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा तिचे अशाप्रकारचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच अनेक सिनेमांच्या सेटवरील अनेक किस्से ऐकिवात आहेतच. करिनाचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या सिनेमात करिनानं पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय ती लवकरच ती लाल सिंह चढ्ढा या सिनेमात आमिर खानसोबत दिसणार आहे. शाहिद-सैफसोबत लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील? करिनानं दिलं धम्माल उत्तर