मुंबई, 16 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. जवळपास 12 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रात हा आकडा 3 हजार पार झाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर जाऊ नये असं वारंवार आवाहन करूनही अनेक ठिकाणी लॉकडाऊन गांभीर्यानं पाळला जात नसल्याचं लक्षात येत आहे. अशा ठिकाणी पोलिसांनी कठोर कारवाई तभारतातील संसर्ग हा रोखायचा असेल त्याच्याविरुद्धचा लढा यशस्वी करायचा असेल तर घरात सुरक्षित राहूनच तो लढा देता येणार आहे. हे युद्ध संयम राखून आणि सुरक्षित घरी राहून जिंकता येणार असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. हा कोरोना व्हायरस इतक्या झपाट्यानं पसरतो कसा असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यांचं साध सोप उत्तर खरंतर बच्चेकंपनीने दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. खेळत असताना त्या खेळातून कोरोना संदर्भात जनजागृती निर्माण करण्याचं काम या चिमुकल्यांनी केलं आहे. साध्या सोप्या शब्दात कोरोना कसा पसरतो आणि ती साखळी तोडायची असेल तर काय करायला हवं हे त्यांनी खेळाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. या बच्चे कंपनीचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होत आहे.
बच्चों ने खेल-खेल में जो बता दिया, उसमें कोरोना महामारी से बचने की एक बड़ी सीख है। pic.twitter.com/n13Z92zi2W
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2020
बच्चे दिल के सच्चे खेल खेल में इतना बड़ा ज्ञान दे दिया
— Satyendra pratap 💎 (@Satyendrabjpup) April 16, 2020
हे वाचा-राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, लक्षात आणून दिला महत्त्वाचा मुद्दा
हा व्हिडीओ आतापर्यंत 169. 5 हजार लोकांनी पाहिला असून 9 हजार युझर्स रिट्वीट केला आहे तर 1 हजारहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. 43 हजार लोकांनी लाईक केलं आहे.
जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. 180 हून अधिक देशांतील 2,083,237 लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेतय. तर आतापर्यंत 1 लाख 34 हजार 610 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजारहून अधिक आहे. तर आतापर्यं 414 रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1 हजार 344 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर जगभरात आतापर्यंत 510,329 रुग्ण बरे झाले आहेत.
हे वाचा-कोरोनानं माय लेकीला केलं वेगळं! बाळाच्या जन्मानंतर 5 दिवसांनी नर्सचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms