मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'1500 किमी अंतर पायी चालत जावू', पण..,उत्तर प्रदेशच्या मजुरांचं धक्कादायक वास्तव

'1500 किमी अंतर पायी चालत जावू', पण..,उत्तर प्रदेशच्या मजुरांचं धक्कादायक वास्तव

ज्यांना धान्य मिळाले तर ते शिजविण्यासाठी रॉकेल नाही. काम नसल्याने हाती पैसे नाहीत, होते ते 21 दिवसात संपले

ज्यांना धान्य मिळाले तर ते शिजविण्यासाठी रॉकेल नाही. काम नसल्याने हाती पैसे नाहीत, होते ते 21 दिवसात संपले

ज्यांना धान्य मिळाले तर ते शिजविण्यासाठी रॉकेल नाही. काम नसल्याने हाती पैसे नाहीत, होते ते 21 दिवसात संपले

भिवंडी, 16 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाउननंतर पुन्हा 19 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा झाल्याने रेल्वे सुरू होतील या आशेवर कसाबसा तग धरून राहिलेल्या भिवंडी शहरातील  यंत्रमाग कामगारांचा आता संयम संपला असून कसे ही, काही ही करून गावाला आपल्या कुटुंबात जाणार हा निश्चय करून भिवंडी शहरातून असंख्य कामगार रात्रीच्या अंधारात 1400 ते 1500 किलोमीटर दूर उत्तरप्रदेश येथील आपल्या गावाकडे जाण्यासाठी रात्रीच्या अंधारात पायपीट सुरू केली आहे.

कोरोना विषाणूची साखळी तोडायची असल्यास त्याचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित करून या काळात उद्योग व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याचा सर्वाधिक फटका हा हातावर पोट भरणाऱ्या हजारो मजूर कामगारांना बसला आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत लाखो स्थलांतरीत मजूर कामगार कष्ट करण्यासाठी येतात. त्यापैकी बहुसंख्य आपले कुटुंब गावाला ठेवून येथे एकत्रित खोली घेऊन राहतात. 21 दिवसांच्या काळात असंख्य यंत्रमाग चालक आणि मालक यांनी कामगारांकडे पाठ फिरवल्याने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अपुऱ्या भोजनावर तर ज्यांना धान्य मिळाले त्यांनी ते शिजवून अर्धपोटी राहून कशी तरी गुजराण केली.

हेही वाचा - सोलापुरातून कोरोनाची धक्कादायक बातमी, 'ती' एक महिला ठरली 10 जणांसाठी घातक

परंतु, त्यानंतर 14 एप्रिल रोजी पुन्हा 19 दिवसांचा अर्थात 3 मे पर्यंत लॉकडाउन कालावधी वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर कामगारांच्या संयमाचा बांध फुटला आणि भिवंडी शहरातील असंख्य कामगार उत्तर प्रदेश राज्यातील आपल्या गावी पायी जाण्यासाठी निघाले आहेत.

सुरुवातीच्या काळात कामगारांची भूक भागविण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थां पुढे आल्या. त्यांच्याकडून मिळणारी खिचडी, पुलाव हे वितरीत होत असल्याने स्थलांतरीत कामगारांच्या भोजनाची व्यवस्था झाली या भ्रमात प्रशासन राहिले. परंतु, 100 ते 150 ग्राम खिचडीत कामगारांची भूक कशी शमणार? ज्यांना धान्य मिळाले तर ते शिजविण्यासाठी रॉकेल नाही. काम नसल्याने हाती पैसे नाहीत, होते ते 21 दिवसात संपले. या द्विधा मनस्थितीत असलेल्या कामगारांनी येथे उपाशी मरण्यापेक्षा गावी जाण्याचा निश्चय केला आणि रात्रीच्या अंधारात गावाच्या दिशेनेपायी निघालो अशी माहिती कामगार संतोष बिंद आणि इतरांनी दिली.

हेही वाचा -'मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे, ते थेट जाळ काढतात'

तर तालुक्यातील पुर्णा गावात राहणारे हमाली काम करणारे सहा जणांचा एक जथ्था महामार्गावर पायी निघाला होता त्यांनी येथे मरण्यापेक्षा रस्त्यात मरू पण आता आम्ही गावाला जाणार हा निश्चय बोलून दाखविला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  टाळण्यासाठी लागू करण्यात आलेली  संचारबंदी आणि वाढविलेला  लॉकडाउन यामुळे हातावर पोट भरणाऱ्या  मजुरांना  रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संयम सुटलेला कामगार पाठीवर एक बॅग आणि हातात पाण्याची बाटली या मोजक्या सामानासह निघाले आहेत.

हेही वाचा -रामायणातील लव-कुश सध्या काय करतात? एक तर आहे प्रसिद्ध अभिनेता

दरम्यान, परराज्यातील नागरिकांनी ते आहेत, तिथेच राहावे. त्यांची सर्वतोपरी काळजी प्रशासन घेईल असे राज्य सरकारकडून वांरवार घोषित करण्यात येते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही प्रकारच्या शासकीय यंत्रणेची मदत मिळत नसल्याने हे कामगार हवालदिल झाले आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: