मराठी बातम्या /बातम्या /पुणे /गर्भपाताच्या गोळ्यांची अवैध विक्री, सापळा रचून दोघांना पकडले, VIDEO

गर्भपाताच्या गोळ्यांची अवैध विक्री, सापळा रचून दोघांना पकडले, VIDEO

'संबंधित गोळ्यांच्या विक्रीला शासनाकडून बंदी असल्याने तसंच तज्ञ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अशा गोळ्यांची विक्री करता येत नाही'

'संबंधित गोळ्यांच्या विक्रीला शासनाकडून बंदी असल्याने तसंच तज्ञ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अशा गोळ्यांची विक्री करता येत नाही'

'संबंधित गोळ्यांच्या विक्रीला शासनाकडून बंदी असल्याने तसंच तज्ञ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अशा गोळ्यांची विक्री करता येत नाही'

अनिस शेख, प्रतिनिधी

देहूरोड, 27 एप्रिल: पुणे (Pune) जिल्ह्यातील देहूरोड (Dehuraod) शहरातील साईनगर भागात असलेल्या शिव कृपा मेडिकल अँड जनरल स्टोअरमधून अवैधरित्या गर्भपात (abortion pills) करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या चढ्यादराने विक्री करत असताना दोन जणांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील शिव कृपा मेडिकल अँड जनरल स्टोअरमध्ये मिसोप्रोस्टोल गोळ्यांची विक्री होत असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांना कळाली. त्यानुसार खात्री करण्यासाठी रमेश यांनी  मेडिकल चालकाला गोळीची मागणी केली असता एका गोळी ची किंमत 1500 रुपये असल्याचे सांगण्यात आले. परंतु ही गोळी तात्काळ न देता दुसऱ्या दिवशी होम डिलिव्हरी करण्यात येईल, असे चालकाकडून सांगण्यात आले. तसंच 500 रुपये रमेशने यांच्याकडून गोळ्यांसाठी ऍडव्हान्स म्हणून घेण्यात आले.

संबंधित गोळ्यांच्या विक्रीला शासनाकडून बंदी असल्याने तसंच तज्ञ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अशा गोळ्यांची विक्री करता येत नसल्याची बाब रमेशन यांना माहीत होती. त्यांनी संबंधित घटनेची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. यामिनी अडबे यांना सांगितली. त्यानुसार, आडबे यांनी स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन गोळ्यांची विक्री करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी देहूरोड येथील सेंट्रल चौकाजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात पोलिसांना सोबत घेऊन सापळा रचण्यात आला.

'पार्टी' आम्ही देऊ, Birthday Boyच्या प्रश्नावर पुणे पोलिसांचा कडक रिप्लाय!

दुसऱ्या दिवशी रमेशन यांना गोळ्यांची विक्री करण्यासाठी आलेला सुनील गाढवे यास पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून त्याच्याकडून मिसोप्रोस्टोल कंपनीच्या गोळ्याचे पाकीट हस्तगत केले त्याच्याकडे अधिक तपास केला असता चिंचवड येथे राहत असलेल्या तसेच एका मेडिकल कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणाऱ्या अनिकेत श्रीसागर यांच्याकडून तो गोळ्या खरेदी करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

'अनेक लोक भूकेने मरत आहेत...' अन्नाचा अपमान केल्याने काजोल झाली ट्रोल

त्यानुसार पोलिसांनी चिंचवड येथील अनिकेत याच्या राहत्या घरावर छापा मारून मिसोप्रोस्टोल या  गोळ्याचे तब्बल 13 पाकिटांसह त्यास ताब्यात घेतले. अनिकेतच्या मोबाईल व्हॉट्सअप चॅटिंगवरून दोघा आरोपींचे ही गोळ्या विक्रीचे कनेक्शन महाराष्ट्रासह परराज्यात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, वेगवेगळी पथक तयार करून राज्यात तसेच राज्याबाहेर चढ्या दराने सुरू असलेल्या गर्भपाताच्या गोळीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

First published:

Tags: Crime, Pune