पुणे, 27 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगाने वाढत आहे. सध्या देशात दिवसाला तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण (Corona cases in India) आढळत आहेत. महाराष्ट्रातही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची (Lockdown in Maharashtra) घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, लॉकडाऊनची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्याचे पोलीस जागोजागी उन्हात आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्याचबरोबर कोरोना लॉकडाऊनचं नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईही करत आहे. सध्या राज्यात लॉकडाऊनची स्थिती असल्यानं अनेकांना आपले वाढदिवस आणि पार्ट्या साजरा करता येत नाहीत. याच पार्श्वभूमीवर ट्विटरवरील एका नेटकऱ्यानं पुणे पोलिसांना (Pune Police tweet) टॅग करून वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्याबाबत परवानगी मागितली आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात वाढदिवसाची पार्टी (Twitter user asked permission for birthday party) देण्यासाठी काय करावं असंही विचारलं आहे. यावेळी पुणे पोलिसांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत संबंधित नेटकऱ्याला भन्नाट रिप्लाय दिला आहे. (हे वाचा- कोरोना आकडेवारीत तफावत; वर्धा जिल्ह्यात कोरोना बाधित किती आणि मृत्यू किती? ) शिवानंद दसरवार नावाच्या एका युवकानं पुणे पोलिसांना टॅग करत म्हटलं की, ‘सर, 1 मे रोजी माझा वाढदिवस आहे. माझे मित्र पार्टीसाठी मागे लागले आहेत. त्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीसाठी किती लोकं हजर राहू शकतात. आणि पार्टी देण्यासाठी काय करावं लागेल.’ त्याच्या या ट्वीटनंतर पुणे पोलिसांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत नेटकऱ्यांची बोलती बंद केली आहे.
तुमच्या मित्रांना लॉकडाऊनच्या काळात बाहेर जायचे असेल तर त्यांना आमचा नंबर द्या. आम्ही त्यांना "पार्टी"साठी आमंत्रित करू.
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) April 27, 2021
वाढदिवसाच्या 'ऍडव्हान्स' मध्ये शुभेच्छा. घरीच राहा, सुरक्षित राहा!#BirthdaySurprise
#StayHome
#StayHomeStaySafe https://t.co/bOK7Zp1sEx
(हे वाचा- कडक सॅल्युट..! आत्महत्या करायला निघालेल्या तरुणीचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण ) त्यांनी संबंधित ट्वीटला रिप्लाय देताना म्हटलं की, ‘तुमच्या मित्रांना लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर जायचं असेल तर त्यांना आमचा नंबर द्या. आम्ही त्यांना “पार्टी"साठी आमंत्रित करू. वाढदिवसाच्या ‘अॅडव्हान्स’ मध्ये शुभेच्छा. घरीच राहा, सुरक्षित राहा!’ पुणे पोलिसांनी केलेलं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं असून यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटलं की, ‘पुढच्या वर्षी वाढदिवस साजरा करायचा असेल, तर घरातच राहा,’ त्याची ही प्रतिक्रियाही व्हायरल होतं आहे.