Home /News /entertainment /

'अनेक लोक भूकेने मरत आहेत...' अन्नाचा अपमान केल्याने काजोल झाली ट्रोल

'अनेक लोक भूकेने मरत आहेत...' अन्नाचा अपमान केल्याने काजोल झाली ट्रोल

काजोल देवगन (Kajol Devgn) ने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडीओ पोस्ट (Kajol shares video) केला आहे. या व्हिडीओ वरुन तिला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

  मुंबई 27 एप्रिल: अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. त्यामुळे अन्नाचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट भारतीय संस्कृतीत वाईट मानली जाते. आणि यामुळेच अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. अभिनेत्री काजोल (Kajol) हिच्या एका व्हिडीओमुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. या व्हिडीओ वरुन तिला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काजोल देवगन (Kajol Devgn) ने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडीओ पोस्ट (Kajol shares video) केला आहे. या व्हिडीओत ती एक सफरचंद हवेत फेकून कापण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तिने आधी हवेत एक सफरचंद फेकलं, त्यानंतर त्याला हवेतच कापलं. या व्हिडीओला तिने ‘मूड’ (mood) असं कॅप्शनही दिलं होतं. पण हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना विशेष आवडला नाही. अन्नाचा अपमान होत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Kajol Devgan (@kajol)

  अनेक नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला नाही त्यांनी काजोलच्या या व्हिडीओला प्रतिक्रिया देत लिहिलं, “अशाप्रकारे खाण्यापिण्याच्या गोष्टी वाया घालवू नको... अनेक लोक भूकेने मरत आहेत”. तर दुसऱ्या युजरने, “लोक भूकेने मरत आहेत.. त्यांचा अपमान करू नको.. जेवण वाया घालवू नको.” असं म्हटलं आहे.

  (वाचा - कार्तिक आर्यनने सार्वजनिक ठिकाणी 'हा' स्टंट करण्यास केली मनाई, काय आहे कारण?)

  काजोल तिच्या सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सतत निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या मुलीसोबतचा लहानपणीचा एक फोटो पोस्ट केला होता.
  View this post on Instagram

  A post shared by Kajol Devgan (@kajol)

  मुलगी न्यासाचा (Nysa Devgn) हा बालपणीचा फोटो आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिने हा फोटो पोस्ट केला होता. या फोटोसाठी तिने एक मोठी पोस्ट देखील लिहिली होती.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Ajay devgan, Bollywood, Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या