मराठी बातम्या /बातम्या /पुणे /भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार, कोथरुडमध्ये खळबळ

भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार, कोथरुडमध्ये खळबळ

मेधा कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला अचानक नवं वळण मिळालं. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने

मेधा कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला अचानक नवं वळण मिळालं. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने

मेधा कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला अचानक नवं वळण मिळालं. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने

पुणे, 20 मार्च : पुण्यातील (Pune) भाजपच्या (BJP)माजी आमदार आणि भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्यावर मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये (Kothrud Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा सुद्धा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (NCP Woman Congress Pune) वतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील रामबाग कॉलनीमध्ये एका ठिकाणी अनधिकृतपणे उसाचा गुऱ्हाळ सुरू आहे. याबद्दल स्थानिक रहिवाशांनी याबद्दल तक्रार केली होती.

45 मिनिटांचा तो काळ खूपच मोठा होता', ट्वीट करत WhatsApp नं सांगितलं कारण

त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी या उसाच्या गुऱ्हाळाबाबत पुणे पालिकेकडे तक्रार केली होती. मेधा कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला अचानक नवं वळण मिळालं. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्याविरोधातच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

महिलाही होऊ शकतात रेस्तराँच्या उत्तम शेफ; अनुकृती देशमुख बदलवतेय मानसिकता

दरम्यान, मागील वर्षी 07 जून रोजी  पुण्यात कोथरुड भागात दारुड्यांना जाब विचारला म्हणून जेष्ठ नागरिक त्यांचा मुलगा, सून यांना दारुड्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यावेळी घटनास्थळाजवळ राहणाऱ्या कोथरुडच्या माजी आमदार भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनाही या दारुड्यांनी धक्काबुक्की केली होती. याबाबत पोलिसांनी 4 पैकी 2 जणांना अटक केली तर मेधा कुलकर्णी यांच्यावर हात उचलणाऱ्यासह 2 जण फरार झाले होते. अमर सयाजी बनसोडे आणि विनोद सुरेश गद्रे अशी आरोपींची नावं होती. याबद्दल मानसी राहुल कोल्हे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

First published:
top videos

    Tags: Congress, Maharashtra, Medha kulkarni, Mumbai, Pune, The woman