चांगले शेफ काही फक्त पुरुषच नसतात; रेस्टॉरंट शेफ अनुकृतीमुळे बदलते आहे मानसिकता

चांगले शेफ काही फक्त पुरुषच नसतात; रेस्टॉरंट शेफ अनुकृतीमुळे बदलते आहे मानसिकता

Chef Anukriti Deshmukh: आज ती दिल्लीतल्या ऑलटुगेदर एक्स्परिमेंटल रेस्तराँची (Altogether Experimental Restaurant) शेफ (Female Chef) आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 20 मार्च :कोणत्याही रेस्तराँमध्ये, जाहिरातीत, सिनेमात पाहिलंत, तरी तुमच्या लक्षात येईल की शेफ पुरुषच (Male Chef) असतात. त्याच्या विरुद्ध चित्र म्हणजे घरच्या स्वयंपाकघराची जबाबदारी पुरुष गरजेच्या वेळीही उचलत नाहीत, हेही सगळीकडे पाहायला मिळतं. या पार्श्वभूमीवर, अलीकडे काही तरुण मुली जाणीवपूर्वक या क्षेत्राकडे वळू लागल्या आहेत. दिल्लीतली शेफ अनुकृती देशमुख हीदेखील त्यांपैकी एक. 'शेफचं काम केवळ पुरुषच करू शकतात आणि महिलांचं कौशल्य केवळ स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ बनवण्यापुरतंच मर्यादित आहे,' ही लोकांची मानसिकता बदलायच्या हेतूने ती या क्षेत्रात आली आहे. दैनिक भास्करने तिच्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

11 वर्षांची असल्यापासूनच अनुकृतीला बेकिंग (Baking) करायला आवडायचं. जसजशी मोठी होत गेली, तसं तिच्या लक्षात येत गेलं, की आपल्या देशात शेफ म्हणून काम केवळ पुरुष मंडळीच करतात. तसंच, महिलांना केवळ घरच्या स्वयंपाकघरात जेवण बनवण्याची जबाबदारी दिली जाते. महिला पुरुषांप्रमाणे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू शकत नाहीत, त्यामुळेच शेफचं काम पुरुषांकडे असणंच ठीक आहे, असा विचारप्रवाहही आहे. हे सगळं तिला पटत नव्हतं. लोकांची मानसिकता बदलणं तितकं सोपं नसतं. पण तरीही ती बदलायचा तिने निश्चय केला. त्यासाठी तिने केवळ उपदेशाचा मार्ग निवडला नाही, तर 'आधी केलं, मग सांगितलं' या मार्गाने जायचं ठरवलं. आज ती दिल्लीतल्या ऑलटुगेदर एक्स्परिमेंटल रेस्तराँची (Altogether Experimental Restaurant) शेफ (Female Chef) आहे. स्वतःचं उदाहरण समाजापुढे ठेवल्यामुळे तिच्याकडे आणि एकंदरच या मुद्द्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे.

फाटक्या जीन्सविषयी बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांची पत्नी जिंकली होती सौंदर्यस्पर्धा

नाइजेला लॉसन, अँथनी बोर्डेन आणि गोर्डन रामसे यांना अनुकृती आपलं प्रेरणास्थान मानते. ऑलटुगेदर एक्स्परिमेंटल रेस्तराँचे मालक आणि हेड शेफ आहेत आनंद. या रेस्तराँचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं किचन केवळ मुलीच सांभाळतात. त्या सगळ्या मुलींच्या नवनव्या कल्पनांसह स्वतःच्या विविध कल्पना घेऊन अनुकृती खाद्यपदार्थांपासून इंटीरियरपर्यंत अनेक गोष्टींमध्ये प्रयोग करते आहे.

अनुकृती सांगते, 'मी माझ्या टीमसह खूप कष्ट करते. जेव्हा आम्ही सगळ्या जणी रात्री उशिरा दिल्लीच्या असुरक्षित वातावरणात बाहेर पडतो, तेव्हा मात्र काहीसा त्रास होतो; पण आम्ही स्वतःच आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यास समर्थ आहोत. मी माझ्या टीमलाही अगदी आत्मविश्वासाने घराबाहेर पडण्यासाठी, स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देत असते.'

डिओडोरंट वापरल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो का?

त्या रेस्तराँचं ओपन किचन पाहिल्यावर ग्राहकांना तिथे सगळ्या मुलीच काम करत असल्याचं दिसतं. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. काही जण विचारतातही, की इथे कोणी पुरुष शेफ नाही का? 'नाही नाही, अजिबात नाही' हे अनुकृतीचं आत्मविश्वासपूर्ण उत्तर त्यांना गप्प बसवतं.

First published: March 20, 2021, 10:36 AM IST

ताज्या बातम्या