मुंबई 20 मार्च : शुक्रवारी रात्री 11 नंतर जगभरात अनेक ठिकाणी whatsapp, facbook, instagram या सेवा ठप्प (WhatsApp Down) झाल्या. या तीनही सेवा सध्या फेसबुक ही एकच कंपनी देत आहे. whatsapp केवळ भारतातच नाही जगभरातील सर्वच देशांमध्ये काही वेळासाठी ठप्प झालं होतं. यानंतर रात्री बारा वाजेच्या आधीच जवळपास ४५ मिनीटांनंतर व्हॉट्सअॅप पुन्हा आधीसारखं काम करू लागलं. यानंतर आता कंपनीनं याबाबत एक ट्वीट केलं आहे.
45 मिनीटांपर्यंत अॅप बंद राहिल्यानं कंपनीने एक निवेदन जारी केले आणि गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. कंपनीनं ट्विटरवर ट्वीट करत लिहिलं, आपल्या सर्वांच्या संयमासाठी आभारी आहे. 45 मिनीट हा खूप मोठा काळ होता मात्र आता आम्ही पुन्हा माघारी आलो आहोत. मात्र, कंपनीनं WhatsApp का बंद झालं याबद्दलच कारण अद्याप जाहीर केलं नाही.
जगभरातील बहुतेक लोकांचं व्हॉट्सअॅप शुक्रवारी काही वेळासाठी काम करत नव्हतं. WhatsApp सोबतच इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेन्जरही डाउन झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
Signal ला झाला फायदा -
WhatsApp डाउन झाल्याचा फायदा सिग्नल अॅपला झाल्याचं दिसलं. WhatsApp डाउन झाल्यानंतर सिग्नलनं ट्वीट करत सांगितलं, की त्यांच्या यूजर्सच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. सर्वांचं स्वागत आहे. WhatsApp ला पुन्हा ठीक करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसोबत आमचं सांत्वन आहे. टेक इंडस्ट्रीच्या बाहेरचे लोक हे कधीच समजू शकत नाहीत की विकेंडला डाउनटाइमची वाट पाहाणं किती विचित्र असतं.
WhatsApp, इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाउन झाल्यानंतर ट्वीटरसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मीम्सचा पूर आल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी याबाबत मीम्स तसंच मजेशीर कोट्स पोस्ट केले. WhatsApp डाउन होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा WhatsApp अचानक डाउन झाल्याचे अनुभव यूजर्सला आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.