पुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं

प्रेमसंबंधातून उमेश इंगळे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी उमेशची हत्या केल्यानंतर त्याचं शीर धडापासून वेगळं केलं.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2018 01:00 PM IST

पुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं

पुणे, 23 जून : पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमसंबंधातून उमेश इंगळे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी उमेशची हत्या केल्यानंतर त्याचं शीर धडापासून वेगळं केलं.  त्याच्या शरीरावर कोयत्याचे अनेक वार होते. शिवाय पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून त्याचे कपडेही गायब करण्यात आलेत.

बिबवेवाडी परिसरातून उमेश इंगळे बेपत्ता झाला होता. त्यानंतर कोंढवा पोलिसांना छिन्नविछिन्न अवस्थेतला एक मृतदेह सापडला. तो मृतदेह उमेश इंगळेचा असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून निजाम हाशमी या व्यक्तीला अटक केलीय. दरम्यान मयत उमेशचं शीर अजून सापडलेलं नाही आहे.

खंडाळा घाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे वाहतुकीचा खोळंबा

ईदच्या दिवशी शीरखुर्मा खाण्याच्या बहाण्याने एका अज्ञात ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. १९ जूनला पुण्याच्या कोंढवा परिसरात मोकळ्या प्लॉटवर खडयात एक मुंडी नसलेले अर्धनग्न धड पोलिसांना मिळाले होते.

उमेश १६ जूनला अप्पर परिसरातून बेपत्ता झाला होता. त्याला निजाम हाशमी यांच्यासोबत बघितले होते. त्याच्यावरून निजामही बिबवेवाडी परिसरातच राहत असल्याचे समजले पुढे तपास केला.

Loading...

रोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आहे जेलमध्ये !

निष्पन्न आरोपी निजाम हाशमी याचे मृत झालेल्या उमेश इंगळे याच्या नात्यातील मुलीशी प्रेम संबंध होते. त्या कारणावरून दोघामध्ये भांडण झाली होती. त्या वादातून खून केला असल्याची कबुली आरोपी निजाम हाशमी यांनी दिली आहे.

त्यानुसार खात्री करून कोंढवा पोलिसांनी आरोपी निजाम हाशमीला अटक केली आहे. मात्र आता पोलिसांना मयताचे शीर आणि अजून कोणी आरोपी यामध्ये सामील आहे का याचा तपास करत आहेत.

हेही वाचा...

व्हिसाशिवाय दुबईमध्ये दोन दिवस फिरू शकतात भारतीय !

दहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली

न्यायाधीशाच्याच घरात हुंडाबळी, 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...