जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / न्यायाधीशाच्याच घरात हुंडाबळी, 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ

न्यायाधीशाच्याच घरात हुंडाबळी, 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ

न्यायाधीशाच्याच घरात हुंडाबळी, 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ

गुन्हा दाखल होताच सर्व सात आरोपी फरार झाले. पीडितेचा सासरा वकील असून अन्य एका दिराने न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नांदेड,22 जून : हुंडयासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन न्यायाधीशांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. नांदेड येथील रहिवाशी शेख वसीम अक्रम या 28 वर्षीय तरुण न्यायाधीशाचा विवाह मुंबई येथील तरुणीशी डिसेंबर 2016 साली झाला. सासरच्यानी पंधरा लाख रुपये हुंडा मागितला होता. लग्नापूर्वी आणि नंतरही न्यायाधीश पती शेख वसीम अक्रम, न्यायाधीश दीर शेख अमीर, न्यायाधीश नंदवई शेख जावीद सिद्दिकीसह सासु ,सासऱ्यांनी हुंडयासाठी विवाहितेचा छळ सुरू केला. सासरच्यानी पंधरा लाख रुपये हुंडा मागितला. लग्नापूर्वी मुलाने कार घेन्यासाठी साडेतीन लाख रुपये घेतले. त्यानंतर हुंडयाच्या साडे अकरा लाख रुपयांसाठी अनेक वेळा मारहाण करण्यात आल्याचा आरोप विवाहितेने केला. पैसे न दिल्याने मारहाण करुन घरात कोंबून ठेवण्यात आलं होतं. अंगावरचे आठ लाख रुपयांचे दागिने काढून घेण्यात आले. शिवाय दोन दिरांनी विनयभंग केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटलंय. पीडितेच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिसांनी हुंडयासाठी छळ करणे, मारहाण करणे, बळजबरी दागिने हिसकावणे आणि विनयभंग या कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल होताच सर्व सात आरोपी फरार झाले. पीडितेचा सासरा वकील असून अन्य एका दिराने न्यायाधीशाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: nanded
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात