मराठी बातम्या /बातम्या /पुणे /चहा पिताना ऑक्सिजन कशाला सुरू, पुणे मनपा अधिकारी रोज वाचवतात 7 टन ऑक्सिजन

चहा पिताना ऑक्सिजन कशाला सुरू, पुणे मनपा अधिकारी रोज वाचवतात 7 टन ऑक्सिजन

या अगदी लहान बाबींमधून दररोज जवळपास सहा ते सात टन ऑक्सिजन मनपा अधिकाऱ्यांनी वाचवला. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

या अगदी लहान बाबींमधून दररोज जवळपास सहा ते सात टन ऑक्सिजन मनपा अधिकाऱ्यांनी वाचवला. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

या अगदी लहान बाबींमधून दररोज जवळपास सहा ते सात टन ऑक्सिजन मनपा अधिकाऱ्यांनी वाचवला. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे, 29 एप्रिल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात ऑक्सिजन तुटवड्यामुळं (oxygen shortage) जणू आणीबाणी निर्माण झाली होती. पुण्यात तर (Pune corona situation) अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होणार होती. या ठिकाणी ऑक्सिजनअभावी अनेकांचे प्राण धोक्यात येऊ शकले असते. पण वेळेवर ऑक्सिजन पोहोचला आणि मोठी हानी टळली. मात्र यानंतर अधिकाऱ्यांनी भविष्यात अशी अटीतटीची वेळ येऊ न देण्याचा निर्णय घेतला. अतिशय अभ्यासपूर्वक आणि नियोजनबद्धरित्या अधिकारी रोज सहा ते सात टन ऑक्सिजन वाचवत आहेत. (PMC officer saving 6 ton oxygen daily)

पुण्यात 16 आणि 17 एप्रिलला ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. महापालिकेनं स्वतःचं टँकर खरेदी करून ऑक्सिजन आणण्यासाठी कर्नाटक, गुजरातला पाठवले. पण ते येईपर्यंत अटीतटीची लढाई होती. सगळेच घाबरलेले होते. या सर्वामुळं अधिकाऱ्यांना प्रचंड तणाव आला. त्यामुळं पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये म्हणूनस अतिरिक्त आयुक्तांनी ऑक्सीजन वापराचे ऑडिट सुरू केले. ऑक्सिजन वाचवण्याचे आदेश दिले.

(वाचा-केंद्राने लशी दिल्या म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण -देवेंद्र फडणवीस)

550 बेड असलेल्या जंबो कोविड सेंटरमध्ये त्यांनी काळजी घेतली. रुग्ण दिवसात दोन तास जेवण, चहा, नैसर्गिक विधी, फोन याला देतो. त्यावेळी अनेकदा ऑक्सिजन सुरूच असाचा. पण यावर लक्ष ठेवत रुग्णाने ऑक्सिजन मास्क काढला की ऑक्सिजन बंद करण्याचा निर्णय गेण्यात आला. त्यासाठी मनुष्यबळही पुरवलं. अत्यंत कमी ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांना ऑक्सीजन काढून समोरील सीओईपी हॉस्टेलमध्ये 24 तास ऑक्सिजनविना ठेवण्याचा प्रयोग केला. गरज पडल्यास त्यांना तातडीनं समोर जंबो हॉस्पिटलमध्ये पुन्हा शिफ्ट करायची तयारी होती.

(वाचा-कोरोनातील अनोखा लग्नसोहळा; वाजत-गाजत नाही, एका वऱ्हाड्यासोबत वरात नवरीच्या दारात)

याचबरोबर महापालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या बाणेर आणि दळवी हॉस्पिटल अशाच सूक्ष्म नोंदी ठेवत गरज नसताना ऑक्सिजन पुरवठा बंद केला. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे, तीन दिवसांत मनपाला लागणारा 21 टन ऑक्सिजन 16-17 टनापर्यंत कमी झाला. म्हणजेच या अगदी लहान बाबींमधून दररोज जवळपास सहा ते सात टन ऑक्सिजन मनपा अधिकाऱ्यांनी वाचवला. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

अधिकाऱ्यांनी तांत्रिक उपकरणांवर लक्ष केंद्रीत केलं असून आणखी दोन टन ऑक्सिजन वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.तसं झाल्यास ई एस आय हॉस्पिटल आणि गणेश कला क्रीडा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड तातडीनं सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. टंचाईच्या काळात पुणे मनपाच्या आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या कल्पकतेमुळं अनेकांचे प्राण वाचवण्याबरोबर वाया जाणारा ऑक्सिजन खरंच एखाद्यासाठी प्राणवायू ठरणार आहे.

First published:

Tags: Oxygen supply, Pune