गोंडा, 29 एप्रिल : देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत देशभरात निर्बंध लावण्यात आले आहे. विशेषत: लग्नसमारंभावरही मर्यादा लावण्यात आल्या आहे. त्याशिवाय येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. कोरोना काळादरम्यान गोंडामध्ये सोमवारी एक अनोखी वरात निघाली. या वरातीत केवळ एक वऱ्हाडी होता. आणि हे वऱ्हाडी दुसरे तिसरे कोणी नाही तर नवरदेवाचे वडील होते. यानंतर नवरीचा भाऊ आणि आईदेखील यात सहभागी झाले. ज्यांनी लग्नाची सर्व जबाबदारी घेतली. येथील दुर्गा माता मंदिराचे भटजी अजय कुमार विधीवत हे लग्न पार पाडलं. (Unique wedding ceremony in Corona)
विशेष म्हणजे या लग्नात एक रुपयादेखील हुंडा घेण्यात आला नाही. भगवान दत्त हे वऱ्हाडी म्हणून आपला मुलगा मोनू याच्यासह सोमवारी सायंकाळी माता दुर्गा मंदिरात पोहोचले. येथे नवरी रेशमी आपली आई कृष्णावती आणि भाऊ सुनील यांच्यासोबत आधीच जाऊन पोहोचल्या होत्या. मोनू आणि रेशमीने एकमेकांना वरमाला घातली आणि ते आयुष्यभराची गाठ बांधली. गोंडाचे ढोढ़िया पारा येथे राहणारे भगवान दत्त यांच्या मुलाचं लग्न सहिबापूर येथे राहणाऱ्या रेशमी चौहान यांच्यासोबत ठरलं होतं. भगवान दत्त यांचे जवळीक अचलपूर गावाचे निवासी राजगीर बहादूर चौहान यांनी हे लग्न ठरवलं होतं.
हे ही वाचा-What an Idea! ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी आता Parlours, या जिल्हात खास सुविधा
सध्या देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यातही दुसऱ्या स्ट्रेनमध्ये देशातील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी लग्न पार पडली. कित्येक राजकीय नेत्यांनीही आपल्या मुला-मुलींच्या लग्नाचं आयोजन केलं होतं. अनेकांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवले. मात्र गोंडा भागात झालेल्या या लग्नात केवळ एकच वऱ्हाडी होता. त्यामुळे नियमांचे पालन केले गेले. व गर्दीही टाळणे शक्य झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Marriage, Uttar pradesh