मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /केंद्राने लशी दिल्या म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण, देवेंद्र फडणवीसांचा दावा

केंद्राने लशी दिल्या म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण, देवेंद्र फडणवीसांचा दावा


'लस ही आपण तयार केली म्हणून ठीक आहे जर परदेशातून मागवली असती तर काय परिस्थिती झाली असती.

'लस ही आपण तयार केली म्हणून ठीक आहे जर परदेशातून मागवली असती तर काय परिस्थिती झाली असती.

'लस ही आपण तयार केली म्हणून ठीक आहे जर परदेशातून मागवली असती तर काय परिस्थिती झाली असती.

अमरावती, 29 एप्रिल : आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीच सांगितले की, देशात सर्वात जास्त लसीकरण (corona vaccine) हे महाराष्ट्राने केले आहे, त्यामुळे केंद्रांनी मोठ्याप्रमाणात लशी दिल्या म्हणूनच हे करता आले आहे' असा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे अमरावतीच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी शहरातील कोविड रुग्णालयाला भेट दिली त्यांनतर विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी अमरावती जिल्ह्याचा कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी लसीकरणाच्या मुद्यावर आपली भूमिका मांडली.

IPL 2021: मुंबई विरुद्धच्या मॅचपूर्वी राजस्थनाला दिलासा, संजूला मिळाला नवा आधार

'लस ही आपण तयार केली म्हणून ठीक आहे जर परदेशातून मागवली असती तर काय परिस्थिती झाली असती. पण, केंद्राने सर्वाधिक लशीचा पुरवठा केल्यामुळे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे', असं मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

अजय देवगन ते सोनू सूद; पाहा तुमच्या आवडत्या कलाकारांचे लॉकडाऊनमधील Photo

पुण्यातील सीरम संस्था कोरोना लस तयार करत आहे. पण लस बनविण्यासाठी कच्चा माल हा अमेरिकेतून येत होता पण तो अचानक बंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलल्यानंतर आता अमेरिका कच्चा माल पाठवत आहे त्यामुळे लवकरच उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल, असं सुद्धा फडणवीस यांनी सांगितलं.

'लशीचे नियोजन करावे लागले'

दरम्यान, 18 ते 44 वर्षापर्यंतच्या नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करावे लागेल असा मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय योग्य ठरणार नाही. लसीकरण करताना लसींचा पुरवठा किती होतो आहे, याचा विचार करून नियोजन करावे लागते. एका दिवसात सर्व लसी तयार होत नाहीत, अशी सूचनाही फडणवीस यांनी यवतमाळमध्ये बोलत असताना दिली.

First published:

Tags: Devendra Fadnavis