जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / नियमांचं उल्लंघन करणं पुण्यातल्या हॉटेल चालकाच्या अंगाशी, भरला दंड

नियमांचं उल्लंघन करणं पुण्यातल्या हॉटेल चालकाच्या अंगाशी, भरला दंड

नियमांचं उल्लंघन करणं पुण्यातल्या हॉटेल चालकाच्या अंगाशी, भरला दंड

PUNE: पुण्यात कोरोना नियमांचं उल्लंघन करणं एका हॉटेल चालकाला चांगलंच भोवलं आहे. या हॉटेल चालकावर केलेल्या कारवाईचीही शहरात जोरदार चर्चा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 23 मे: सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. राज्यातील कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारनं लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारनं काही निर्बंध घातले आहेत. बऱ्याचंदा सरकारनं दिलेल्या नियमांचं अनेक ठिकाणी उल्लंघन होताना पाहिलं आहे. अनेक नागरिक नियमांचं वारंवार उल्लंघन करत असतात. मात्र पुण्यात कोरोना नियमांचं उल्लंघन करणं एका हॉटेल चालकाला चांगलंच भोवलं आहे. तसंच या हॉटेल चालकावर केलेल्या कारवाईचीही शहरात जोरदार चर्चा आहे. पुण्यातील भवानी पेठेत असलेलं हॉटेल मिलनला चांगलाच फटका बसला आहे. हॉटेलमध्ये चालकानं 40 ते 50 नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केल्यानं महापालिकेनं हॉटेल मालकाकडून तब्बल एक लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. हेही वाचा- गोवा सरकारचं ठरलं, 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारनं हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा देण्याची मुभा दिली आहे. मात्र पुण्यातील भवानी पेठेत असलेल्या मिलन हॉटेलच्या मालकानं नियमांचं उल्लंघन केलं आणि हॉटेलमध्ये 40 ते 50 नागरिकांना प्रवेश दिला. तसंच त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही हॉटेलमध्ये करण्यात आली होती. याबाबतची माहिती भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हेही वाचा-  Barge P305: कसे होते ‘ते’ समुद्रातील 9 तास, अनिल वायचाल यांचा थरारक अनुभव त्यावर बनकर यांनी हॉटेल मालकास कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड आकारला आहे. तसंच यापुढे अशी घटना झाल्यास हॉटेल सील करण्यात येईल, अशी समजही हॉटेल मालकाला देण्यात आल्याचं सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात