Home /News /goa /

गोव्यात 10 वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

गोव्यात 10 वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

Goa Board Exam: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानं गोव्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

    गोवा, 23 मे: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानं गोव्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात लांबणीवर टाकलेल्या दहावीच्या (10th board exams) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गोवा सरकारनं घेतला. तर येत्या बुधवारपर्यंत बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 12 वीच्या (12th board examination) परीक्षांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. तसंच दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांवर आधारित पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. जर अंतर्गत गुण कमी असल्यास आणि कोणता विषय राहत असेल त्यांना एटीकेटीची मुभा असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे. येत्या दोन दिवसांत जेईई, नीट परीक्षांसंदर्भात केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. राज्यातील बारावीच्या परीक्षांबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बुधवारपर्यंत परीक्षांबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- Barge P305: कसे होते 'ते' समुद्रातील 9 तास, अनिल वायचाल यांचा थरारक अनुभव तर 11 वीच्या प्रवेशाबाबत विज्ञान आणि पदविका क्षेत्रात चढाओढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका दिवसाची तीन तासांची ऑब्जेटिव्ह परीक्षा घेऊन त्यानंतर त्या-त्या क्षेत्रात प्रवेश दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Board Exam, Coronavirus, Goa

    पुढील बातम्या