पुणे, 30 जुलै: पुणेकरांनी (Pune) पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. पुण्यात आज मेट्रोची (Pune Metro) पहिली चाचणी (First trial run)पार पडली. पुण्यातील वनाझ ते रामवाडी (Vanaz and Ramwadi ) या मेट्रो कॉरिडॉर मधल्या वनाझ ते आयडियल कॉलनी या 100 मीटर मार्गावर चाचणी झाली. अजित पवारांनी हिरवा झेंडा दाखवला.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मेट्रो बोगीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. 24 डिसेंबर 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमिपूजन करण्यात आलं होतं.
कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी झूमवरुन संवाद साधला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरुवात झाली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवार यांच्याकडे सूत्र गेल्यावर चाचणी झाली, असं महापौर मोहोळ यांनी यावेळी म्हटलं आहे. विकासाच्या कामात राजकारण आणलं नाही. याचं पुणे मेट्रो हे उदाहरण असल्याचंही ते म्हणालेत. वनाझ ते गरवारे कॉलेज टप्पा ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये सुरू होईल असं पुणे मेट्रोच्या ब्रजेश दीक्षितांनी सांगितलं असल्याचंही महापौरांनी सांगितलं आहे.
याआधी 7 जुलै रोजी वनाज ते रामवाडी या भागाची रात्रीच्या दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. आज कोथरूड ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी झाली.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून ही माहिती दिली होती. पुणे मेट्रोच्या या टप्प्याची चाचणी उद्या सकाळी 7 वाजता केली जाणार असून त्यावर “संकल्पातून सिद्धीकडे; पुणे मेट्रोची उद्या ट्रायल!” असं ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं होतं.
वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान मेट्रोची धाव
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात मेट्रोची चाचणी पार पडली. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे 3.5 किलोमीटर अंतरात ही चाचणी घेण्यात आली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती.
Coronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट? शास्त्रज्ञांनी केला खुलासा
चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर 5 किलोमीटरचा भुयारी मार्ग होणार आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असे एकूण 32 किलोमीटरचे मेट्रो मार्ग आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Pune, Pune metro