• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Coronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट? शास्त्रज्ञांनी केला खुलासा

Coronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट? शास्त्रज्ञांनी केला खुलासा

शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की विषाणू एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या शरीरातच स्वतःमध्ये बदल घडवून आणतो आणि एकदा बदल झाला की तो त्याच बदलांमुळे नवीन लोकांना संक्रमित करतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 30 जुलै : वेगवेगळ्या संशोधन संस्थांमधील वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे, की कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकारच्या व्हेरिएंटच्या (Coronavirus Variants) निर्मितीचं गूढ उलगडलं आहे. 27 जुलै रोजी प्रीप्रिंट सर्व्हर MedRxiv वर प्रकाशित झालेल्या एका संशोधनात, शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की विषाणू एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या शरीरातच स्वतःमध्ये बदल घडवून आणतो आणि एकदा बदल झाला की तो त्याच बदलांमुळे नवीन लोकांना संक्रमित करतो. यामुळे नवीन व्हेरिएंट (New Variants of Coronavirus) उदयास येतात. टीमनं केलेल्या संशोधनात असं समोर आलं, की व्यक्तींमध्ये जवळपास 80 टक्के जिनोम सिक्वेसिंगनंतर नवा व्हेरिएंट किंवा स्ट्रेन (Coronavirus Strains) निर्माण होतो. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की वेळोवेळी व्यक्ती आणि लोकसंख्येमध्ये व्हायरसच्या रुपांमध्ये होणाऱ्या बदलाचा मागोवा घेतल्यास फायदा आणि हानी होण्याची शक्यता असलेल्या साइट्सना महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. अभ्यासानुसार, लोकसंख्येमध्ये विषाणूचा प्रसार आणि लागण होण्याच्या भविष्यवाणीसाठी ही माहिती खूप उपयुक्त ठरेल. इंट्रा-होस्ट व्हेरिएबिलिटीसह नॉव्हेल कोरोनाव्हायरस जीनोमचे विश्लेषण आता पुढची पायरी असावी. केरळमध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 22 हजार रुग्ण, महाराष्ट्रातही वाढतायत आकडे रिसर्चमध्ये या संस्था सहभागी - या संशोधनामध्ये सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB), हैदराबाद, इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (सीएसआयआर-आयजीआयबी), दिल्ली, इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस, भुवनेश्वर, अकादमी फॉर सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च, गाझियाबाद, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, नवी दिल्ली आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, जोधपूर याठिकाणच्या संशोधकांनी या अभ्यासात भाग घेतला. संशोधकांनी महामारीच्या दोन वेगवेगळ्या कालावधीतील कोविड -19 रुग्णांच्या नमुन्यांचं विश्लेषण केलं. पहिल्या टप्प्यात, टीमनं जून 2020 पर्यंत चीन, जर्मनी, मलेशिया, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि भारताच्या विविध भागातील लोकसंख्येमधून गोळा केलेल्या 1,347 नमुन्यांचे विश्लेषण केले.
  Published by:Kiran Pharate
  First published: