Home /News /pune /

लोणावळ्यात पर्यटनस्थळी प्रशासनाकडून कलम 144 लागू, एक किलोमीटरपर्यंत वाहनांना बंदी

लोणावळ्यात पर्यटनस्थळी प्रशासनाकडून कलम 144 लागू, एक किलोमीटरपर्यंत वाहनांना बंदी

Lonavla Section 144: पुणे (Pune) आणि पिंपरी चिंडवड (Pimpri Chinchwad) मध्ये निर्बंध (Restrictions) कायम राहणार असल्याचं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे.

    पुणे, 16 जुलै: येत्या आठवड्यातही पुणे (Pune) आणि पिंपरी चिंडवड (Pimpri Chinchwad) मध्ये निर्बंध (Restrictions) कायम राहणार असल्याचं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील (Lonavla) पर्यटनस्थळी 144 कलम (Section 144) लागू करण्यात आला आहे. पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात (Pune Corona Virus) तेच निर्बंध (Lockdown) कायम ठेवण्यात आले आहेत. येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. शनिवार, रविवार विकेंडला अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध लागूच राहणार आहेत. तसंच पर्यटन स्थळी बंदीच असेल. लोणावळ्यात कलम 144 लागू लोणावळ्यात पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आला असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी असेल. आजपासून नवीन नियम लागू करण्यात आलेत. नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर NCPच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया या पर्यटनास्थळावर नियम लागू भुशी डॅम घुबड तलाव लोणावळा डॅम तुंगाली डॅम राजमाची पॉइंट मंकी पॉइंट अमृतांजन ब्रिज वलवण डॅम एकविरा मंदिर परिसर वेहेरगाव टायगर पॉइंट लायन पॉइंट शिवलिंग पॉइंट कार्ला लेणी भाजे लेणी लोहगड किल्ला तुंग किल्ला विसापुर किल्ला तिकोणा किल्ला पवना धरण परिसर भाजे धबधबा धबधबे आणि धरण या ठिकाणी एक किलोमीटरपर्यंतच्या परिसरात हे नियम लागू राहतील. विद्यार्थ्यांनो! निकालासंदर्भातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा या बातमीवर आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात जसे निर्बंध आहेत राहतील, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. पालिकेचे आदेश पुणे शहरात positivity दर 5 टक्क्यांच्या खालीच आहे मात्र असं असूनही बंधनं शिथील करायला प्रशासन तयार नाही. अजित पवारांच्या आढाव्या बैठकी आधीच पुणे पालिकेनं आदेश काढून निर्बंध कायम राहतील असे आदेश काढले. या निर्बंधानुसार व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात काही तालुक्यात 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू झाले असले तरी पुणे शहरात सर्व शैक्षणिक संस्था 31 जुलै पर्यंत बंदच राहतील असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown, Pune

    पुढील बातम्या